Published on
:
15 Nov 2024, 10:27 am
Updated on
:
15 Nov 2024, 10:27 am
बाकर विधानसभा २०२४ निवडणुका आता रंगात आली आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु धारूर व धारूर तालुक्याच्या महत्याच्या प्रक्षांवर उमेदवार बोलताना दिसून येत नाहीत तर केवळ जातीपाती व राजकारणांच्या गप्पा मारल्या जात आहेत यामुळे जातीपातीचे राजकारण ब राजकारणीय गप्पांना भूलथापांना आत्ता धारूरकर वैतागले आहेत. कमळ भाग्यामधून विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत.
माजलगाव विभानसभा निवडणूक आता रंगात आली असून धारूर तालुक्याचे मतदान है महत्याचे समजले जाते. तालुक्याच्या मतदानाबरच विधानसभेचे गणिते जुळवली जाणार आहेत. धारूर शहर व तालुक्यात्त ये प्रश्न गामध्ये महत्वाचे चाहेत परंतु उमेदवार धारूरच्या भूत प्रत्रावर न बोलता इतरच या मारत आहेत. आज शहरासमोर अनेक मूलभूत प्रश्न उभे आहेत या अरुंद घाट, महादुर्ग किल्लापर्यटन विकास, धारूर ग्रामीण रुग्णालय, धारूर बसस्थानकाचे जीर्ण झालेली इमारत, पाणीप्रश्र अशा अनेक प्रश्न समोर उभे आहेत.
हे प्रश्न सोडवण्यात नेहमीच लोकप्रतिनिधींना अपयश आलेले आहे आता या विधानसभेत तरी हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन उमेदवारांनी द्यायला हवे परंतु असे न करता ह्याची जिरवा, त्याची जिरवा, जातीपातीचे राजकारण राजकीय भूलथापा मारल्या जात आहेत, पामुळे अशा गप्पांना धारूरकर आता चांगलेच कदरले आहेत.
धारुरच्या मूलभूत प्रक्षांकडे उमेदवारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु मूलभूत प्रांवर कोणीही बोलताना आढळून येत नाही केमळ आम्ही विकास केला, आम्ही विकास केला अशाच गप्पा मारल्या जात आहेत राजकीय गप्पांना आत्ता धारूरकर वैतागले आहेत. दररोज भोंग्यातूनच विकास दिसून येत आहे. प्रत्यक्षात पारूर शहर विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसत आहे आता तरी उमेदवारांनी धारूरच्या मूलभूत प्रश्रावर बोलावे असे सर्वसामान्य जनतेचे म्हणणे आहे.
धारूरचे महत्त्वाचे प्रश्न
अरुंद घाट
धारूर शहरांमध्ये येण्यासाठी असलेला अरुंद घाट हा जीवघेणा घाट आहे. हा घाट म्हणजे मरणाची बाट असे समजले जात आहेत. एक दिवसाआड अपपातामी मालिका सुरूच आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, आर्थिक हानी, अपंगत्व अनेकांना आलेले आहे. हा घाट संद केल्याशिवाय पर्याय नाही एकदा खाली गेलेला व्यक्ती वरी सुखरूप येईल का नाही हा भरोसा नाही.
स्थलांतर रोखणे
आज धारूर शहराची बाजारपेठ ग्रामीण भागावर अवलंबून आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील जनता ऊसतोड मजूर म्हणून ऊस तोडणीसाठी जाते. यामुळे बाजारपेठेतील आर्थिक चक्र मंदावते व्यापारी सहा महिने परेशान असतात. यासाठी स्थलांतर रोखून येथेच उद्योगधंदे उभारणे गरजेचे आहे.
महादुर्ग किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा
धारूर शहरात असलेला महादुर्ग किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा मिळून ग्रापला हवा तो जर मिळाला तर इतर लोक, पर्यटक शहरांमध्ये येतील व दळ णवळणाला सालना मिळेल, गामुळे गा महादुर्ग किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा मिळून त्याचा विकास होणे गरजेचे आहे.
ग्रामीण रुग्णालय रस्ताअपुरा कर्मचारी स्टाफ
धारूर ग्रामीण रुग्णालय है तालुक्याला कादान ठरले आहे. परंतु या रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे. हा रस्ता होणे गरजेचे आहे तसेच ग्रामीण रुग्णालयात पूर्ण स्टाफ, कर्मचारी वर्ग असायला हवा परंतु आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोणाचाच बनक नाही.
जीर्ण झालेले बसस्थानक
धारूर बसस्थानकाचे चाळीस वर्षांपूर्वीची इमारत जीर्ण झालेली असून इथे सुसज्व असे इमारत होणे गरजेचे आहे. परंतु राजकीय उदासीनतेमुळे ही होऊ शकले नाही. कोणत्याही शहराचे नाक म्हणजे बसस्थानक असते परंतु हे बसस्थानक मोडकळीस आलेले आहे.