‘मुलगी नकार देऊ शकत नसेल तर…’, इंडस्ट्रीमधील लैंगिक संबंधांबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाचं खळबळजनक वक्तव्य

3 days ago 2

Imtiaz Ali connected Casting Couch: झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर, प्रत्येकाला तडजोड करावीच लागले… असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल आणि वाचलं असेल. अनेक सेलिब्रिटी इंडस्ट्रीमध्ये त्यांना आलेल्या वाईट अनुभवांबद्दल सांगत असतात. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी देखील बॉलिवूडमध्ये सर्रास चालणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. तडजोड केल्यामुळे तुम्हाला वाटत असेल इंडस्ट्री तुमचा मार्ग मोकळा होईल आणि तुम्हाला सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळेल… तर हा तुमचा गैरसमज आहे… असं इम्तियाज अली म्हणाले.

IFFI Goa याठिकाणी इम्तियाज अली यांनी कास्टिंग काऊचबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. इम्तियाज अली म्हणाले, ‘मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळपास 15 ते 20 वर्षांपासून सक्रिय आहे. कास्टिंग काऊचबद्दल देखील मी फार ऐकलं आङे. एक मुलगी येते… ती प्रचंड घाबरलेली असते… आणि तिला रोल मिळवण्यासाठी तडजोड करण्याची गरज भासते… मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे… जर एक महिला किंला मुलगी नकार देत नसेल तर, तिच्या यशस्वी होण्याची संभावना वाढेलच असं काहीही नाही…’

‘मुलींना स्वतःचा आदर करावा लागेल…’

इम्तियाज अली पुढे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींनी नकार द्यायला शिकलं पाहिजे… जेव्हा मुली स्वतःचा आदर करायला शिकतील, तेव्हाच इतर लोकं देखील मुलींचा आदर करतील… मी आणि माझ्यासारख्या अन्य व्यक्ती देखील हाच विचार करतात, आपण ज्या मुलीला कास्ट करत आहोत… त्या मुलीचा आदर करायला हवा…’

हे सुद्धा वाचा

‘मी अनेकदा पाहिलं आहे मुली काम मिळवण्यासाठी तडजोड करतात. अशा मुलींना एक दिवस स्वतःच्या करियरसोबत तडजोड करावी लागते…’ असं देखील दिग्दर्शक इम्तियाज अली म्हणाले…

दिग्दर्शक इम्तियाज अली यांचे सिनेमे

इम्तियाज अली यांनी अनेक हीट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘लव आजकल’, ‘हाईवे’, ‘जब वी मेट’, ‘जब हैरी मेट सेजल’, ‘लैला मजून’ आणि ‘लव आज कल’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अमर सिंह चमकीला’ सिनेमाचं देखील अली यांनी दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article