Published on
:
21 Nov 2024, 7:15 am
Updated on
:
21 Nov 2024, 7:15 am
जालना, पुढारी वृत्तसेवा 'मी मतदान केले, तुम्हीही मतदानाचा हक्क बजावा', माझे मत लोकशाहीला... देश विकासाला... अशा टॅगलाईनचा वापर करीत तरुणाईने सोशल मीडिया निवडणुकीचा जागर करीत सर्वांना मतदान करण्यासाठी साद घातली.
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून गल्ली ते दिल्ली प्रचाराचा धुरळा उडत आहे. हटके रिल्स, व्हिडीओज, फोटोच्या माध्यमातून तरुणांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारात रंगत आणली. निवडणूक सुरू झाल्यापासून राजकीय पक्षांनी सोशल मीडिया सांभाळणारी स्वतंत्र यंत्रणा राबविली. त्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया 'बॉररूम देखील सज्ज ठेवण्यात आली होती. जालना मतदारसघांसाठी बुधवारी (दि.२०) रोजी मतदान झाले. मतदानाच्या आदल्या दिवशी पासून सोशल मीडियावर मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांचे व्हिडीओ, रिल्स, व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. यात तरुणाही मागे राहिली नाही.
निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी आवाहन केले. प्रिय मतदार, राज्यासाठी आपले योगदान द्यायचे चुकवू नका. मतदानाचा दिवस हा कोणतीही सबब सांगण्याचा दिवस नाही. आपले मत आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सामील व्हा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना सोशल मीडियावर मेसेज पाठवून केले. लोकशाहीसाठी मतदान करा, अशी साद घालताना दिसून आले. अनेकांनी मतदान केल्यानंतर मतदान केल्याची निशाणी दाखवत काढलेले फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर केले. सहकुटुंब मतदान केल्यानंतर सेल्फी घेऊन सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्या तर काहीजणांनी निवडणुकीत उमेदवार, राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्यासमवेत फोटो काढून सोशल मौडियावर व्हायरल केले.
नवमतदारांना सेल्फीचा मोह
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजा- वणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये उत्साह दिसून आला. आई- वडिलांसमवेत मतदान केंद्रात जाऊन मतदान केल्यावर सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण मित्र-मैत्रिणींना दाख- वून एकत्रित फोटोसेशनही अनेकांनी केले.