Maharashtra Political News LIVE successful Marathi : आज 7 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
live breaking
LIVE NEWS & UPDATES
-
07 Feb 2025 08:05 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर, शिवकालीन वाघनखं बघण्याची नागपूरकरांना संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर येणार असून मध्यवर्ती संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. शिवकालीन वाघनखं बघण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर येणार असून मध्यवर्ती संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. शिवकालीन वाघनखं बघण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशीही ते चर्चा करणार आहेत. मीरा-भाईंदर शहरास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा शुक्रवारी 24 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहरात पुन्हा पाणीटंचाई निर्माण होणार आहे. जळगाव जिल्ह्यात तब्बल 1700 पेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रस्ताव, इस्टिमेट याच प्रक्रिया अद्यापही सुरू असून या सर्वांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया रखडल्यास पाहायला मिळत आहे. यासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळतील. लेटेस्ट अपडेटसाठी वाचत रहा हा ब्लॉग.
Published On - Feb 07,2025 8:04 AM