महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. महायुती सरकारला यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे मिळाले. आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहेत. मात्र त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. आता लाडकी बहीण […]
sanjay raut
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. महायुती सरकारला यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे मिळाले. आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहेत. मात्र त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात 5 लाखांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन संजय राऊतांनी जोरदार टोला लगावला.
हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून गाळल्या जातील. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. निवडणुका संपलेल्या आहेत. बहिणींनी मतं दिलेली आहेत. दर महिन्याचे १५०० रुपये असे तीन महिने त्यांना पैसे पोहोचले आहेत. आता पैसे नाही. त्यामुळे त्यांना जेवढं ओझं कमी करता येईल, तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांकडून या योजनेवर कठोर भाष्य करण्यात आले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे…