महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. पण या निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केला. यानंतर ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप सातत्याने महायुतीवर केला जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6.00 नंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी ईव्हीएममध्ये कशाप्रकारे फेरफार झाला, मतदार कसे वा़ढले, याबद्दल सविस्तर भाष्य केले.
महाराष्ट्र निवडणुकीतील आम्हाला काही माहिती मिळाली आहे. आम्ही डिटेल्स अभ्यास केला. मतदार यादी आणि व्होटिंग पॅटर्न आम्ही तपासला. त्यात अनेक तफावत दिसून आली. तरुण मुलं मुली लोकशाहीवर विश्वास ठेवतात. सरकारने निवडणुकीसाठी एक समिती स्थापन केली होती. त्यात चीफ जस्टीस असायचे. त्यांना काढून भाजपच्या माणसाला घेतले. निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त बदलले. विधानसभेत २०१९ आणि लोकसभा २०२४मध्ये ३२ लाख मतदार मतदार अॅड झाले. पाच वर्षात ३४ लाख मतदार वाढले. पाच वर्षाच्या तुलनेत पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले. हो लोक कोण आहेत? असा सवाल राहुल गांधींनी केला.
या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे मतदार वाढले. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत मतदार कसे वाढले. महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी. महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख. मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे वाढले? निवडणुकीपूर्वी एवढे मतदार कसे आले? पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले. विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे? असे अनेक सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले.
ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली ते दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजातील आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला विचारलं. पण त्यांनी आजतागायत काहीच उत्तर दिलेलं नाही. मी डेटा दिला आहे. मी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला विचारत आहोत. महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही विचारत आहोत. हे मतदार वाढले कसे. निवडणुकीत पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी आमची नाही. तुमची आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.