मानवी जीवन सोपे आणि यशस्वी बनवण्यासंबंधी चाणक्य नीतीमध्ये या नीति ग्रंथामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात करिअर, मैत्री, वैवाहिक जीवन, संपत्ती आणि महिलांशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. खरंतर आजही आचार्य चाणक्यांनी दिलेली धोरणे केवळ राज्यकारभारासाठीच नव्हे तर मानवी जीवनातही अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
चाणक्यांनी नीती शास्त्रामध्ये पैसा, प्रगती, विवाह, मैत्री, शत्रुत्व आणि व्यापार इत्यादी समस्यांवर उपाय सांगितले आहेत. चाणक्य नीतीमध्ये स्त्री-पुरुष संबंध तसेच त्यांच्या गुणांचाही उल्लेख आहे. खरं तर, लग्न हे प्रत्येकासाठी खूप खास असते आणि आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती यावी, जी त्यांना सर्व प्रकारे प्रेम देऊ शकेल आणि त्यांची काळजी घेऊ शकेल,असे प्रत्येकाला वाटत असतं. एक चांगला जीवनसाथी आयुष्यात आनंद आणू शकतो,असं म्हणतात .
पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात असे म्हणतात. दोघेही सुख-दुःखाचे सोबती असतात. पण तरीही आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या कुणाला सांगू नयेत. चाणक्य नीतिनुसार, या गोष्टी पतीने पत्नीपासून लपवून ठेवण्यातच शहाणपण असतं. अन्यथा पतीला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पुरुषांनी आपल्या पत्नीला कोणत्या गोष्टी सांगू नयेत, हे जाणून घेऊया
तुमची कमजोरी
आचार्य चाणक्य सांगतात, की जर तुमच्यात काही कमजोरी असेल,तुमची एखादी दुबळी बाजू असेल तर त्याची माहिती फक्त स्वतःकडे ठेवा. हे तुम्ही तुमच्या पत्नीलाही सांगू नका. जर तुमच्या पत्नीला तुमच्या कमकुवतपणाबद्दल समजले तर ती तुमच्या कमजोरीवर हल्ला करू शकते. प्रत्येक गोष्टीबद्दल बोलून दाखवेल, सुनावेल . त्यामुळे तुमची कमजोरी कोणाला सांगू नका.
अपमान
आचार्य चाणक्य त्यांच्या नीतिशास्त्रात सांगतात, की पुरुषांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या अपमानाबद्दल कधीही सांगू नये. स्त्रिया पुन्हा पुन्हा त्याच अपमानाबद्दल टोमणे मारतात असे मानले जाते.
केलेलं दान
दानाचे मूल्य तेव्हाच असते जेव्हा ते गुप्तपणे केले जाते. एका हाताने काही गोष्ट दिली असेल तर त्याबद्दल दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या दानाबद्दल तुमच्या पत्नीलाही सांगू नका. यामुळे तुमच्या देणगीचे महत्त्व तर कमी होतेच, पण कधी कधी तुमची पत्नी धर्मादायतेवर झालेल्या खर्चाचे कारण सांगून तुम्हाला बरं- वाईट सुनावू शकते.
कमाई
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, तुम्ही तुमच्या कमाईबद्दल पत्नीला कधीही सांगू नये. जर तिला तुमच्या कमाईची माहिती मिळाली तर ती त्यावर तिचा अधिकार सांगून तुमचे सर्व खर्च थांबवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे काही वेळा महत्त्वाच्या कामावर परिणाम होऊ शकतो.