सध्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. त्याचाच फायदा सायबर भामटे घेत आहेत. शेतकर्यांना गंडा घालण्यात येत आहे. तुमच्या पण मोबाईलवर PM किसान योजनेसंदर्भात लिंक आल्यास ती उघडू नका, नाहीतर बँक खाते खाली होईल. नाशिकमध्ये शेतकर्यांचा फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. काय आहे हा स्कॅम? शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून अशी रक्कम झाली गायब.
लिंक उघडताच मोबाईल हॅक
मोबाईलवर आलेल्या PM किसान योजनेची लिंक उघडण्याअगोदर ही माहिती आवर्जून वाचा. मोबाईलवर आलेल्या PM किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांच्या खात्यातून पैसे गायब झाले आहेत. या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकरने शेतकर्यांच्या खात्यातून पैसे गायब केले आहेत.
हे सुद्धा वाचा
नाशिक जिल्ह्यातील अनेकांची या लिंक च्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. PM किसान योजनेची लिंक आहे, म्हणून शेतकर्यांनी पाहण्यासाठी लिंक उघडली. लिंक उघडताच खात्यातून पैसे गायब झाले. PM किसान योजनेची बनावट लिंक मोबाईलवर पाठवून शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक झालेल्या शेतकर्यांनी नाशिक पोलिसांकडे तक्रार केली आहे.
अशी होते फसवणूक
मोबाईलवर पीएम किसान योजनेची फेक लिंक पाठवण्यात येते. बँक खात्याशी सलग्न मोबाईल फोन हँक करून शेतकर्यांची फसवणूक करण्यात येते. एपीके फाईलच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे. APK File डाऊनलोड करताच मोबाईलमध्ये विशिष्ट प्रोगाम ॲक्टिव्ह होतो. टप्प्याटप्प्याने बँक खात्यातील रक्कम काढून घेण्यात येते. त्यामुले अशी कोणतीही लिंक जर तुमच्या खात्यावर आली असेल. तर ती उघडू नका. त्यातील एपीके फाईलवर क्लिक करू नका.
19 वा हप्ता मिळणार की नाही?
या योजनेत सरकारकडून आतापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत. शेतकर्यांना आता 19 वा हप्ता देण्यात येणार आहे. त्याची शेतकर्यांना प्रतिक्षा आहे. योजनेत देशातील 13 कोटींहून अधिक शेतकर्यांना लाभ होतो. तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार की नाही, हे तुम्हाला अगोदरच तपासता येणार आहे. त्यासाठी अधिकृत साईट pmkisan.gov.in ला भेट द्या. ‘Know Your Status’ वर क्लिक करा. या ठिकाणी नोंदणीकृत क्रमांक टाकून तपास करा.