अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळात प्रथमच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. दोन्ही नेत्यांची भेट अमेरिकेचे राष्ट्रध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊसमध्ये होणार आहे. या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढवला जात आहे. अमेरिकेकडून संरक्षण उपकरणे आणि शस्त्र खरेदीसाठी ट्रम्प सरकार भारतावर दबाव वाढत आहे.
अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप और पीएम नरेंद्र मोदी की मुलाकात से पहले गुरुवार को भारत के रक्षा मंत्री राजनाथ सिंह और अमेरिकी रक्षा सचिव पीट हेगसेथ की फोन पर बातचीत हुई. इस दौरान दोनों नेताओं ने भारत और अमेरिका के बीच रक्षा सहयोग बढ़ाने को लेकर अपनी सहमति जताई.
अमेरिका-भारतामध्ये मोठी डील
अमेरिका आणि भारत यांच्यात संरक्षण क्षेत्रातील व्यापार अनेक वर्षांपासून आहे. दोन्ही देश एकमेकांचे चांगले सहयोगी आहेत. सन 2007 पासून आतापर्यंत दोन्ही देशांत 25 अब्ज डॉलरपेक्षा जास्त डिफेन्स डील झाली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच त्यांची अपेक्षा अधिकच वाढली आहे. भारताने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाण शस्त्रास्त्रे आणि संरक्षण साहित्याची खरेदी करावी, अशी अपेक्षा अमेरिकेला आहे.
हे सुद्धा वाचा
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. त्यावेळीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकन शस्त्रास्त्रांची खरेदी वाढवण्याची विनंती केली होती.
ट्रम्प यांचे धोरण व्यावसायिक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यवसायाबाबत नेहमीच व्यवहारीक दृष्टिकोन राहिला आहे. कोणत्याही देशासोबतच्या व्यापारात अमेरिकेचे नुकसान होऊ नये, असे त्यांचे मत आहे. अलीकडेच त्यांनी सौदी अरेबियाबद्दल असेही म्हटले होते की, जर ते मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडून जास्त आयात करत असतील तर ट्रम्प सौदी अरेबियाचा पहिला अधिकृत दौरा करू शकतात. आता डोनाल्ड ट्रम्प देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला तशी संधी म्हणून पाहत आहेत.
अमेरिकेचे लक्ष F-21 चा कराराकडे
अमेरिकेचे लक्ष मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट डीलकडेही लागले आहे. भारताला 114 मल्टीरोल लढाऊ विमाने खरेदी करायची आहेत. जर हा करार अमेरिकेसोबत झाला तर तो एक मोठा संरक्षण करार असेल. मात्र, या कराराबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. परंतु सर्व आंतरराष्ट्रीय फायटर जेट निर्माते हा करार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही विमाने परदेशी सहकार्याने भारतात बनवली जातील. अमेरिका त्यांच्या F-21 फायटिंग विमाने भारताला विकण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही विमाने अत्याधुनिक F-16 फायटर जेटची प्रगत अपग्रेडेड आवृत्ती आहे.