प्रवीण दटके आणि बंटी शेळकेचे कार्यकर्ते आमने सामने
नागपूर (Maharashtra Election 2024) : महाराष्ट्र विधानसभेतील 288 जागांसाठी आज मतदान पार पडले. निवडणुकीचे मतदान पूर्ण हाेऊन काही तास उलटताच नागपुरात काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तूफान राडा सुरु झाला. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार (Praveen Datke) प्रवीण दटके यांना धक्काबुक्की करीत, काँग्रेसच्या (Bunty shelke) बंटी शेळकेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.
मध्य नागपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रवीण दटके (Praveen Datke) आणि काँग्रेसकडून बंटी शेळके (Bunty shelke) रिंगणात आहेत. मतदान पूर्ण होताच डमी EVM नेण्यात येत हाेत्या. हा ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचा संशय घेत काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळकेच्या कार्यकर्त्यांनी EVMची गाडी थांबवली. यातच काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या (Maharashtra Election 2024) घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, पाेलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासाठी साैम्य बळाचा वापर करण्यात आला आहे.