पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रीपद जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यात चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना काल राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यामध्ये बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत. बीड सोबतच अजित पवार यांच्याकडे पुण्याचं देखील पालकमंत्रीपद असणार आहे. यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री?
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्रीआशिष जयस्वाल
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
मुंबई शहर- एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
नाशिक – गिरीष महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडे
Published on: Jan 19, 2025 12:17 PM