इटोली, पांगरी येथील घटना
परभणी (Women molested) : जिंतूर पोलीस ठाणे हद्दित दोन वेगवेगळ्या गावांमध्ये दोन विवाहितांचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिंतूर तालुक्यातील ईटोली आणि पांगरी येथे विनयभंगाच्या घटना घडल्या. ईटोली येथील घटनेमध्ये पिडित महिला ही घरामध्ये झोपलेली असताना आरोपीने अनाधिकृतपणे प्रवेश करत महिलेचा विनयभंग केला. तसेच पिडितेच्या पतीला थापडबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना १६ जानेवारीच्या रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली. या (Women molested) प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन भिमा घुगे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि. लोकडे करत आहेत.
तर दुसरी घटना १७ जानेवारीच्या सायंकाळी साडे सातच्या सुमारास पांगरी येथे घडली. या ठिकाणी पिडिता ही चार्जिंगला लावलेला मोबाईल घरी घेऊन येत असताना आरोपी भगवान कामिटे याने पिडितेच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला. पिडितेचा हात धरुन वाईट उद्देशाने बोलत तिचा विनयभंग केला. (Women molested) सदर प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि. पुंड करत आहेत.