सैफवरील हल्ल्याला वेगळे वळण दिले जातंय:मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने हा विषय बांगलादेशकडे जात आहे, रोहित पवारांचा आरोप

3 hours ago 1
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याचे प्रकरण दुसरीकडे वळवण्यात येत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याला वेगळे वळण दिले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने राजकीय नेत्यांचे ऐकून हा तपास बांगलादेशकडे घेऊन जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याच मुद्यावरून राज्याच्या राजकारणात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न चर्चेत आला आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सवाल करत टीका केली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांनीही पुण्यामधील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले रोहित पवार? सैफ अली खानचा विषय भलतीकडे वळवू नका. हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. त्यातून समोर येईलच. मात्र बाबा सिद्दीकी यांच्याबाबतीत पण तसंच झाले. सिद्दीकींचा मुलगा त्यांच्या वडिलांचा खून करणारे आरोपी वेगळेच आहेत, यामध्ये बिल्डर लॉबीचा हात असू शकतो, असे सांगत असले तरी त्याच्या कडे सरकार लक्ष देत नाही. तसेच सैफ अली खानच्या बाबतीत देखील. हे प्रकरण दुसरीकडे नेण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे, असा दावा रोहित पवारांनी केला. तपास बांगलादेशकडे घेऊन जात आहेत नेते, कलाकार, सेलिब्रिटी सेफ नाहीत, हा विषय सुरू असतानाच त्याच्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्याबाबत कुठेतरी राजकीय नेत्यांचे ऐकून हा तपास आता बांगलादेशकडे घेऊन जात आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे हा विषय तिकडे नेला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. दावोसमधील कराराचा आकडा फुगवून सांगू नका रोहित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. दावोसमध्ये करार करताना बाहेरच्या कंपन्यासोबत करार करावा. मुंबईत कंपन्यांचे ऑफिस आहे, त्यांच्याशी करार करू नका. आकडा फुगवून सांगू नका, असा सल्ला दिला. डेटा घेऊन आम्ही विश्लेषण करणार असल्याचेही ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article