एका चार ते पाच महिलांच्या टोळीने बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड लंपास केल्याची घटना शहाडच्या नवरंग सोसायटीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भंगार गोळा करण्याच्या नावाखाली या महिलांच्या टोळीने घराची रेकी केली आणि नंतर ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणात कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहाडच्या नवरंग सोसायटीत चार ते पाच महिलांच्या टोळीने बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, भंगार गोळा करण्याच्या नावाखाली टोळीने संपूर्ण इमारतीची रेकी केली होती. बंद घराची निवड केल्याचे उघडकीस आले आहे. पहाटेच्या वेळेस हा चोरीचा बेत तडीस नेल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाणे या प्रकरणाचा तपास करीत आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिला आरोपींचा शोध घेत आहेत. अशा प्रकारच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे सुद्धा वाचा
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत घटना कैद
शहाड पश्चिम येथे स्टेशनच्या बाजूला लागून असलेल्या नवरंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या ईश्वर अडांगळे यांच्या घरात चोरी झाली आहे. अडांगळे कुटुंब काही दिवसांपासून दुसऱ्या इमारतीत शिफ्ट झाले होते. मात्र, नवरंग सोसायटीमधील आपल्या घरात आले असता, त्यांना दरवाजाचे टाळे तोडलेले आढळले. तसेच घरातील मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह पाच हजारांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. सकाळी आठ वाजता चार ते पाच महिला चोर इमारतीत शिरताना या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यांनी बंद घराचे टाळे फोडले आणि मौल्यवान वस्तू गोळा करून पोबारा केला. अडांगळे कुटुंबाने खडकपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे .