बीसीसीआयनने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी 18 जानेवारीला भारतीय संघाती घोषणा केली. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी एक एक करत 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. बीसीसीआय निवड समितीने संजू सॅमसन आणि करुण नायर याला दोघांना संधी दिली नाही. त्यावरुन सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. या चर्चेदरम्यान टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया मायदेशात नववर्षातील पहिलीवहिली आणि टी 20i मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाने सराव केला. या सराव सत्रादरम्यान 427 दिवसानंतर खास नजारा पाहायला मिळाला. मोहम्मद शमी अनेक महिन्यांच्या कमबॅकनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंसह सराव करताना दिसला. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी हे चित्र फार दिलासादायक आहे.
इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मोहम्मद शमी याने या मालिकेतून वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. आता शमी मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याआधी शमीने सहकाऱ्यांसह घाम गाळला.
427 दिवसांनी कमबॅक
टी 20i मालिकेतील सलामीचा सामना हा कोलकातमधील ईडन गार्डमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया 18 जानेवारीला कोलकातात पोहचली आणि सरावाला सुरुवात केली. मोहम्मद शमीवर सर्वांचं लक्ष होतं, जो 427 दिवसांनंतर टीम इंडियासह सराव सत्रात सहभागी झाला होता. शमीन या सराव सत्रात बॉलिंग केली. शमीला दुखापतीमुळे वर्षाभरापेक्षा अधिक वेळ टीम इंडियापासून दूर रहावं लागलं. मात्र आता तो सज्ज झाला आहे.
इंडिया-इंग्लंड टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, ईडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.