धनंजय मुंडेंनी सुरेश धस आणि जरांगेंना थेट आव्हान दिलेलं आहे. माझ्यावरती एक तरी आरोप सिद्ध करून दाखवा असं मुंडेंनी म्हटलंय. नाव न घेता धनंजय मुंडे यांनी सुरेश धसांवर पलटवार केला.
मला बदनाम करा पण बीडची बदनामी करू नका. असं नाव न घेता धनंजय मुंडे यांनी सुरेश धसांवर पलटवार केला. तर आपण बीडची बदनामी करत नसून बदनामी आखा पॅटर्नची होते आहे असं धस म्हणाले. इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघाला. ज्यात जरांग्यांनी एकही आरोपी सुटला तर महाराष्ट्र बंद पाडू असा सरकारला इशारा दिला. धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपाव्या लागतील तेव्हाच निर्घृण हत्येचे प्रकार थांबतील अशी टीकाही जरांगेंनी सभेतून केली. त्यावर एक तरी आरोप सिद्ध करा असं म्हणत मुंडेंनी धस आणि जरांगे यांना चॅलेंज दिलं. ‘अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपवा लागणार आहे त्याशिवाय चालणार नाही. कारण यांनी ह्यात टोळ्या उभ्या केल्यात. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या 26 दिवसानंतर आपण त्यांनी त्याच्या लोकांना शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले तर जे आरोप आहेत ज्या आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर काही आता बोलायचं नाही. ज्या वेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होण हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्य वाटणारी गोष्ट आहे, असं धनंजय मुंडे म्हणालेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jan 19, 2025 11:25 PM