गिरीश महाजन, आदिती तटकरेFile Photo
Published on
:
19 Jan 2025, 6:06 pm
Updated on
:
19 Jan 2025, 6:06 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : दीड महिन्यापासून पालकमंत्रीपदाची रखडलेली यादी काल शनिवारी १८ जानेवारी रोजी राज्य शासनाने जाहिर केली. पण महायुतीच्या घटकपक्षांमध्ये यावरुन धुसपूस सुरु होती. त्याचाच परिणाम म्हणजे आज नाशिक व रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. यावरुन पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडे दिले होते. तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली होती पण आज या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदांना महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिली आहे. नाशिक चे पालकमंत्रीपद हे मुळचे जळगावचे असलले गिरीश महाजन यांना दिले होते. तर रायगडवर शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांनी दावा केला होता. पण याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांनी बाजी मारली होती पण आता या दोन्ही पालकमंत्रीपदांना राज्य शासनाने स्थगिती दिली आहे.