विद्युत खांबावर दुरूस्तीचे काम करताना विजेचा झटका लागून मजुराचा मृत्यू झाला.
Published on
:
19 Jan 2025, 3:59 pm
Updated on
:
19 Jan 2025, 3:59 pm
पूर्णा : चालू लाईन असलेल्या विद्यूत खांबावर चढून काम करताना विजेचा जोरदार झटका बसल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१९) सायकांळी साडेपाचच्या सुमारास घडली. विशाल सुदाम जोगदंड ( वय (२२ वर्ष, रा.गौर ता.पूर्णा) असे या मजूराचे नाव आहे.
महावितरण अंतर्गत रोजंदारीवर विद्यूतचे तो काम करत होता. महावितरणच्या गुत्तेदाराने सांगितल्याप्रमाणे पुर्णा येथील टि पॉईंट कॉर्नर ते झिरोफाटा रोडवर असलेल्या कॉटन जिनिंगजवळच्या खांबावर तो काम करत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोनि विलास गोबाडे हे पथकासह अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर मृतदेह खांबावरून काढण्यात आला.