ज्यूदो स्पर्धेत विजेत्यांना दहा लाखांचे बक्षीस:पुण्यात नॅशनल गेम्सच्या आयोजनासाठी प्रयत्न करणार - केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ

2 hours ago 1
पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुलात आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पुन्हा नॅशनल गेम्सचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात विशेष उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांनी स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण दहा लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली. सुवर्णपदक विजेत्यांना ११ हजार, रौप्यपदक विजेत्यांना ७ हजार आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये मिळणार आहेत. मंत्री मोहोळ यांनी ज्यूदो आणि कुस्ती या दोन्ही युद्धकलांमधील साम्य अधोरेखित केले. या स्पर्धेत देशातील २९ राज्यांमधून २३५ मुले आणि २३० मुली सहभागी झाल्या आहेत. कार्यक्रमास इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे तथागत मुखर्जी, ज्यूदो फेडरेशनचे पदाधिकारी वीरेंद्र वशिष्ठ, सी एस राजन, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त जीवन शर्मा, अर्जुन पुरस्कारप्राप्त यशपाल सोलंकी आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेते सचिन खिलारे यांची विशेष उपस्थिती होती. राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. पुण्यातील प्रतिष्ठित गोल्फ स्पर्धेत मोठा सहभाग: पूना क्लब गोल्फ लीग-२०२५ मध्ये २४० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार येरवडा येथील पुना क्लबच्या गोल्फ कोर्सवर होणाऱ्या प्रतिष्ठेच्या पूना क्लब गोल्फ लीग-२०२५ स्पर्धेसाठी १५ संघांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेत २४० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.पूना क्लबचे अध्यक्ष व जॅग्वार्स संघाचे मालक गौरव गढोक यांच्या मते, ही स्पर्धा पुण्याच्या गोल्फ स्पर्धा मालिकेचा उच्च दर्जाचा मानदंड आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील अव्वल खेळाडू, अनुभवी खेळाडू आणि हौशी गोल्फपटूंना एकत्र आणून कौशल्य, सांघिक वृत्ती आणि खेळावरील निष्ठा यांचा संगम साधणारे हे व्यासपीठ आहे.लीगचे कार्यकारी अध्यक्ष इंद्रनील मुजगुले यांनी सांगितले की, ही स्पर्धा विविध क्षेत्रातील नातेसंबंध घडवण्याची आणि गोल्फवरील प्रेम साजरे करण्याची सुवर्णसंधी आहे. गोल्फकोर्सचे कॅप्टन जय शिर्के यांनी स्पर्धेतील सहकार्य आणि बंधुभावाचे महत्त्व अधोरेखित केले.स्पर्धेत ऑटोमेक बेकर्स, व्हॅस्कॉन द होली वन्स, शिर्के बर्डीज बँडिट्स, जॅग्वार्स, पिन सीकर्स, पार-टी टायगर्स, हिलियॉस ईगल्स, अडवाणी सुपर किंग्ज, मेव्हरिक्स, केके रॉयल्स, शुबान सनरायजर्स, फेअरवे टायटन्स, ऍक्रोपॉलिज स्टार्स, गेरा आऊटडोअर्स आणि जिंजर्स या १५ संघांचा समावेश आहे. स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य आदित्य कानिटकर यांनी सांगितले की, प्रत्येक संघाचा उत्साह आणि खेळाडूवृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article