Icc Champions Trophy 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियात पहिल्यांदाच 9 खेळाडूंना संधी, कोण आहेत ते?

3 hours ago 1

Indian Cricket Team Icc Champions Trophy 2025 : बीसीसीआय निवड समितीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. त्यापैकी 9 खेळाडू हे पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.

| Updated on: Jan 19, 2025 | 5:55 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होतेय. या स्पर्धेसाठी निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी 18 जानेवारी रोजी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या 15 पैकी 9 खेळाडूंची या स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे. ते 9 खेळाडू कोण आहेत? जाणून घेऊयात. (Photo Credit : Arshdeep Singh X Account)

1 / 10

 Shubman gill X Account)

टीम इंडियासाठी वनडेत द्विशतक करणाऱ्या शुबमन गिल याची चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. तसेच शुबमन गिल टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. (Photo Credit : Shubman gill X Account)

2 / 10

 Yashasvi Jaiswal X Account)

टीम इंडियाचा युवा सलामीवीर याची एकदिवसीय संघात निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे यशस्वीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याचं एकदिवसीय पदार्पण ठरेल. (Photo Credit : Yashasvi Jaiswal X Account)

3 / 10

 K L Rahul X Account)

केएल राहुल याच्यावर बॅटिंगसह विकेटकीपिंग अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. केएल राहुल टीम इंडियाचा प्रमुख विकेटकीपर आहे. (Photo Credit : K L Rahul X Account)

4 / 10

भारताचा विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत याने संजू सॅमसनवर मात करत संघात दुसरा विकेटकीपर म्हणून स्थान मिळवलंय. पंत या स्पर्धेत कशी कामगिरी करतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. (Photo Credit : Rishabh Pant x Account)

5 / 10

 Shreyas Iyer x Account)

श्रेयस अय्यर याचंही संघात पुनरागमन झालं आहे. श्रेयसने भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अफलातून कामगिरी केली होती. श्रेयसकडून या चॅम्पियन्स ट्रॉफीतही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे. (Photo Credit : Shreyas Iyer x Account)

6 / 10

ऑलराउंडर अक्षर पटेलकडून बॅटिंगसह फिरकी गोलंदाजाची जबाबदारी असणार आहे. अक्षरने नुकत्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत अप्रतिम फिल्डिंगही केली होती. आता अक्षर या 50 षटकांच्या सामन्यात कशी कामगिरी करतो? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Photo Credit : Axar patel X Account)

7 / 10

 Washington Sundar X Account)

वॉशिंग्टन सुंदर फिरकी गोलंदाजीसह बॅटिंगही करतो. सुंदरला ऑलराउंडर म्हणूनच संघात स्थान दिलंय. त्यामुळे सुंदरकडून नावाप्रमाणेच कामगिरी अपेक्षित असणार आहे. (Photo Credit : Washington Sundar X Account)

8 / 10

 Kuldeep Yadav X Account)

कुलदीप यादववर फिरकी गोलंदाजाची मदार असणार आहे. त्याच्या सोबतीला अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर असतील. मात्र कुलदीपकडून फिरकी गोलंदाज म्हणून अधिकची अपेक्षा असणार आहे. (Photo Credit : Kuldeep Yadav X Account)

9 / 10

 Arshdeep Singh X Account)

तसेच निवड समितीने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला डच्चू देत अर्शदीप सिंग याचा समावेश केला आहे. त्यामुळे या 25 वर्षीय गोलंदाजावर मोठी जबाबदारी असणार आहे. (Photo Credit : Arshdeep Singh X Account)

10 / 10

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article