राज्यातील 13 उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान:'शिक्षण माझा वसा 2025' पुरस्काराने ग्रामीण-दुर्गम भागातील शिक्षकांचा गौरव

3 hours ago 1
पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात 'शिक्षण माझा वसा २०२५' या राज्यस्तरीय पुरस्काराने १३ उपक्रमशील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. वंदे मातरम्‌चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस, सूचीकार शिल्पा सबनीस आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षणविवेकतर्फे गेल्या १२ वर्षांपासून दिला जाणारा हा पुरस्कार शिक्षणक्षेत्रात सकारात्मक कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देतो. कार्यक्रमात मिलिंद सबनीस यांनी उपक्रमशीलतेचे महत्त्व विशद केले. त्यांच्या मते, शिक्षक हा विद्यार्थी आणि शिक्षणसंस्था यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, प्रत्येक विद्यार्थ्याशी त्याचे वैयक्तिक नाते असते. विशेष म्हणजे या पुरस्काराद्वारे ग्रामीण आणि दुर्गम भागातील शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. मर्यादित संसाधनांमध्येही उत्कृष्ट काम करणाऱ्या या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरूषोत्तम लोहिया, शिक्षणविवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि विवेक समूह सदस्य धनंजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सबनीस यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत उपक्रमशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिके आणि कृतींद्वारे विषय समजावून देण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील द्विमार्गी शिक्षण प्रक्रियेवर त्यांनी भर दिला, ज्यामध्ये शिक्षकही विद्यार्थ्यांकडून नवीन गोष्टी शिकत असतात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article