मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या सगळ्या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी केली आहे. ”हे जे अमानवीय कृत्य घडलं आहे, त्याला जवळपास 40 दिवस होत आले आहेत. यातील एक आरोपी फरार आहे. घटना घडण्याच्या आगोदर आणि घटना घडल्यानंतर ज्या कोणीही या लोकांना मदत केली, त्यांचा अद्यापही तपास सुरू आहे. लवकरच तो तपास पूर्ण होईल. या सगळ्या आरोपींंना फाशी दिली जाईल, तेव्हाच या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत”, असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
धनंजय देशमुख म्हणाले की, जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत देशमुख कुटुंबीयच नाही, तर गाव, प्रत्येक तालुका आणि राज्यभर जे न्यायाच्या भूमिकेत उतरलेले लोक आहेत, ते कधीही थांबणार नाही. कारण इथं गुन्हेगारी थांबली तर, पुढे एक चांगला संदेश जाणार आहे की, गुन्हेगारीला या महाराष्ट्रात कुठेही थारा नाही.”
ते म्हणाले की, ”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या यंत्रणांचा हाच शब्द आहे की, जोपर्यंत गॅंगमधील शेवटच्या आरोपीलाही जेलबंद होऊन त्याला फाशीची शिक्षा होता नाही, तोपर्यंत हे सरकार ही सगळी यंत्रणा थांबणार नाही.”