मानोरा (Pandan Road) : गावाच्या हद्दीतील बंद होत असलेले शेत शिवार व वहिवाटीने पडलेल्या पायवाट खुल्या करण्याचा निर्णय आता जिल्हा प्रशासन घेणार असून वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य शासनाने हा निर्णय अमलात आणला आहे. आता जिल्हाधिकारी मार्फत महसूल प्रशासनाला आदेश दिला आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीत मोठ्या प्रमाणावर विभाजन होत आहे. शेतीचे विभाजन मोठ्या प्रमाणात होत असून परिणामी क्षेत्र कमी होत आहे.
शेतात जाणारे मार्गही बंद करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वहिवाट रस्ते ग्रामीण (Pandan Road) रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते खुले करण्याकरिता अनेक दिवसापासून महसूल प्रशासणाकडे प्रकरणे प्रलंबित असल्याकारणाने अनेक वेळा भांडण तंटे वाढत असल्याची बाब परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड व पंचायत समितीच्या सदस्या राठोड यांनी याबाबत सतत पाठपुरावा करत पंचायत समितीच्या सभागृहात तसा ठराव घेत प्रशासनासमोर मांडला होता.
मानोरा तालुक्यातील विठोली, आसोला, बेलोरा, गव्हा, चाकुर, अभईखेडा, आमगव्हाण, कोडोली येथील पांदण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यांच्या प्रस्तावाला मंजुरीची मागणी करत अनेक पादन रस्ते (Pandan Road) वादात अडकले असून, त्याची प्रकरणे स्थानिक महसूल प्रशासनाकडे धुळखात पडली आहेत. आता या प्रस्तावांना तातडीने महसूल प्रशासनाकडून प्रकरणाचे स्थळ निरीक्षण करणे मोजणी करणे तसेच सुनावणी घेणे बंधनकारक आहे. त्यातून रस्त्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
या संदर्भात योग्य कार्यवाही करण्यासाठी आता जिल्हाधिकारी या नवीन आदेशाची अंमलबजावणी करणार असुन, त्यावर तहसीलदार,गटविकास अधिकारी, भुमिअभिलेख, पोलीस निरीक्षक, गावाचे तलाठी यांना कायदेशीर बाबींची सूचना दिल्या जाणार आहे. गावातील पायवाटा या गावाच्या नकाशातून तुटक रेषेने दर्शविलेल्या आहेत. या पायवाटांची रुंदी सव्वा आठ फूट करायला हवी तसेच ग्रामीण गाडी मार्ग हा साडेसोळा ते २१ फुटापर्यंत रुंद करण्याचे आदेशात म्हटले आह. प्रथम गावाचे शिवार रस्ते पायवाट याच्या शोध घ्यावा त्यानंतर संबंधित भूगवटदारासोबत बैठक घेऊन त्याची समजूत काढावी, असे आदेशात नमूद आहे.
वेळ पडली तर पोलिस बळाचा वापर
पानं रस्त्यांना ग्रामीण भागात शिवार रस्तेही म्हटले जाते. या रस्त्यासह पायवाट ग्रामीण गाडी मार्ग खुले करण्यासाठी गावाचे सरपंच तलाठी तहसीलदार गटविकास अधिकारी एकत्रित बैठक घेतील तरी मार्ग मोकळा न झाल्यास पोलिसांचा सहकार्याने हा (Pandan Road) मार्ग खुला करण्याचा आदेशही जिल्हाधिकारी मार्फत दिला जाणार असल्याचे आदेशात स्वयंस्पष्ट निदर्शनास येते. याबाबत (Deshonnati Effect) दैनिक देशोन्नतीने दि २२ ऑक्टोंबर २०२४ बातमी प्रकाशित करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. हे विशेष!