प्रातिनिधीक छायाचित्रfile photo
Published on
:
19 Jan 2025, 12:09 pm
Updated on
:
19 Jan 2025, 12:09 pm
भंडारा: आसगाव-ढोलसर मार्गावर बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली. वनविभागाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले. होमराज ईश्वर बागडे रा. ढोलसर, सावन वसंत मेश्राम रा. नवेगाव आणि तेजस एकनाथ भुरे रा. बाचेवाडी अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे नागरिक भयभीत आहेत. हे तिघे जण रस्त्याने जात असताना अचानक बिबट्याने हल्ला चढविला. त्यांच्या आरओरड करण्याचा आवाज ऐकून लोकांनी धाव घेत बिबट्याला हुसकावून लावले. बिबट कालव्याच्या पाइपमध्ये जाऊन लपला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळपर्यंत वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर बिबट्याला पकडण्यात विभागाला यश आले आहे.