हिंगोलीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस प्रारंभ
हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : चळवळीला जर उब द्यायची असेल तर समाज एक संघ असला पाहिजे आणि सर्व गटातटांनी समाजातील ज्वलंत प्रश्न घेऊन लढा उभारल्यास चळवळ बांधता येऊ शकते आणि चळवळ पुन्हा उभी करता येवू शकते असा आशावाद प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक आणि विचारवंत प्रा. डाॅ. ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केला.
हिंगोली येथील बौद्ध संस्कृतिक मंडळाच्या वतीने उज्वल इंग्लिश हायस्कूल च्या प्रांगणात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) व्याख्यानमाले चे ३८ व्या वर्षाचे उदघाटक व व्याख्याते प्रा. कांबळे हे होते, अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रा. शत्रुघ्न जाधव हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थापक मिलिंद इंगळे यांची उपस्थिती होती.
व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प चळवळीच्या पुनर मांडणीची गरज-अर्थात चळवळी बांधारे या विषयावर प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे (छ. संभाजीनगर) यांनी गुंफले. तब्बल सव्वा तास विषयाची मांडणी करीत असताना (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले विविध चळवळी व लढे आणि त्या काळातील आंबेडकरांचे कार्यकर्ते याचे उदाहरणे देऊन त्या काळातील निष्ठा आणि आत्ताची निष्ठा व चळवळी याचे उदाहरणे देऊन सांगितले की, डॉ.बाबासाहेब म्हणाले होती की,जोपर्यंत समाजाचा एक नेता, एक पक्ष आणि एक झेंडा असेल तरच तो पक्ष सत्ते पर्यंत जाऊ शकतो. आज आहे का असे चित्र महाराष्ट्रात असा प्रश्न प्रा. कांबळे यांनी यावेळी उपस्थित करीत मा. कांशीराम यांनी हा फार्मूला वापरून उत्तर प्रदेशात बाबासाहेबांचा निळा झेंडा फडकला होता असे सांगितले.
आपल्या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) अभिप्रेत असलेली चळवळ उभी करण्यासाठी तीन गोष्टीची गरज लागणार आहे त्यामध्ये पहिली हि की, वेगवेगळ्या गटातटामध्ये विभागलेल्या नेते व कार्यकर्त्यांवर समाजाचा धाक असला पाहिजे.
दुसरी आशिकी,समाजामध्ये एकजुटी संदर्भात व सामाजिक विकासा संदर्भात प्रबोधन वर्ग चालले पाहिजे,आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध जातीनां सोबत घेऊन त्यांच्यात नेतृत्व उभे केले पाहिजे. असे सांगून ते म्हणाले की, यापुढे कोणताही नेता गट तट घेऊन समाजात आल्यास त्याला वस्ती बंद केली पाहिजे असा कानमंत्र त्यानी दिला. याशिवाय पुनर्बांधणी शक्य नाही असे सांगून ते म्हणाले की, लोकांचे प्रश्न घेऊन लढे उभे केल्यास चळवळ पुन्हा उभी राहू शकते,आज अनेक प्रश्न आहेत रेल्वेचे, विमानाचे शाळा-महाविद्यालयाचे खाजगीकरण, कामगारांचे, शेतमजुरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, नवीन शैक्षणिक धोरण, येणाऱ्या काळात अनेक संकटे समाजापुढे उभे राहणार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे पराकाष्टेने मिळवले होते ते ते आता सत्ताधाऱ्यांकडून नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे,तेव्हा आजचे आपले राजकीय पक्ष व संसद आणि विधानमंडळात पाठविलेले सदस्य काय करत आहेत असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित करून हेलोक फक्त त्यांच्या राजकीय पक्षाची भूमिका मांडताना दिसतात समाजाची नाही.
असे सांगून ते पुढे म्हणाले, समाजालाही आजकाल चळवळ उभी करण्याचे भानच राहिले नाही. तेव्हा समाजाने व येथे विखुरलेल्या गटातटातील राजकीय पक्षांनी किमान जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढलं पाहिजे, जेव्हा समाज गर्केत जातो गुलामीच्या वाटेवर असतो तेव्हा बाबासाहेब नीट समजून घेऊन प्रश्न ऐरणीवर ठेवून जर लोकांचं जागरण केलं, प्रबोधन केलं, तर चळवळीला पुन्हा उब देता येऊ शकते आणि आणि चळवळ व्यापक करता येऊ शकते आणि चळवळीचं वादळ निर्माण करता येऊ शकते असा विश्वास व्याख्यात्यांनी व्यक्त केला. आपल्या व्याख्यानात संयोजकाचे खास करून अभिनंदन केले की,अशाही परिस्थितीमध्ये मागील ३८ वर्षापासून सातत्याने ही मंडळी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) अनुयायी म्हणून घेत असलेल्या प्रत्येकानी सामान्य व्यक्ती व दुःखीताचे दुःख दूर करण्यासाठी कंबर कसली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष कैलास भुजंगळे यांनी केले. संचलन कोषाध्यक्ष प्रा. डॉ. सचीन हटकर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय गंगाधर पाईकराव यांनी करून दिला, याप्रसंगी त्रिशरण पंचशील उपाध्यक्ष सुभाष भिसे यांनी म्हटले राष्ट्रगीताने पहिल्या पुष्पाचा समारोप झाला. यशस्वीतेसाठी प्रवीण रुईकर, बबन दांडेकर, आर. के. वाकळे, प्रदीप इंगोले,भीमराव कुरुडे,यु.पी.खंदारे,बबन गायकवाड आदीसह कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.