Mahavitran Go-Green Services: वऱ्हाडातील 28 हजारापेक्षा जास्त ग्राहक झाले डिजीटल

2 hours ago 1

छापील बिल नाकारल्याने वर्षाकाठी होते ३४ लाखाची बचत

अमरावती (Mahavitran Go-Green Services) : वऱ्हाडातील २८ हजार ४२३ वीज ग्राहकांनी छापील वीजबिल नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून (Mahavitran) महावितरणच्या गो – ग्रीन सेवेचा लाभ घेतल्याने त्यांना वर्षाकाठी ३४ लाख १० हजार ७६० रूपयाची बचत होते.वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रत्येक वीजबिलामागे दर महीन्याला १० आणि वर्षाला १२० रूपयाची सुट देण्यात येते.

‘गो-ग्रीन’ सेवेत प्रत्येक बिलात १० रूपयाची सुट

महावितरण (MSEDCL) ने ग्राहकांसाठी पर्यावरणपूरक “गो ग्रीन” योजना सुरू केली आहे, ज्याचा उद्देश कागदाचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करणे आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणे आहे. या योजनेअंतर्गत (Mahavitran) महावितरण ग्राहकांना त्यांचे वीजबिल ईमेलद्वारे मिळते. ज्यामुळे कागदी बिलांचा वापर टाळता येतो. या योजनेमुळे झाडे वाचवण्यास मदत होते, कारण प्रत्येक महिन्यात लाखो कागदी बिले पाठवण्याची गरज कमी होते.

योजनेचा मुख्य उद्देश :

  • कागदाचा वापर कमी करणे: कागदी बिलांच्या छपाईसाठी आवश्यक असलेल्या कागदाचा वापर टाळून झाडांची कत्तल कमी होते.
  • ऊर्जेची बचत: डिजिटल बिलांसह कागदी बिलांचे वितरण, छपाई, आणि वाहतूक यामध्ये होणारा ऊर्जा वापर कमी होतो.
  • सुलभता: ग्राहकांना त्यांचे बिले त्वरित आणि सोप्या पद्धतीने ईमेलद्वारे प्राप्त होतात.
  • पर्यावरण रक्षण: कमी कागद वापरून आणि ऊर्जा वाचवून पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.
  • गुप्तता आणि सुरक्षा: ईमेलद्वारे बिल मिळाल्याने बिल सुरक्षित असते आणि याचा मागोवा घेणं सोपं असतं.

महावितरणच्या (Mahavitran) ‘गो-ग्रीन’ योजनेमधून बिलासाठी कागदाचा वापर बंद केला तरी वीज बिलाची दरमहा प्रत संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे. सद्यस्थितीत वऱ्हाडाअंतर्गत अमरावती (८,०३८), यवतमाळ (५,३५३), अकोला (५,७४३), बुलडाणा (६,७९५) आणि वाशीम (२,४९४) ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article