प्रत्येक लाभार्थी सदस्यांनी के वायसी करावी- तहसिलदार यांचे आवाहन!
मानोरा (Manora) : शासनाकडून रेशन कार्ड मधील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसी न करणाऱ्या सदस्यांचे धान्य बंद होणार आहे. त्यामुळे या महिन्यात आपल्या गावातील अथवा नजीकच्या रास्त भाव दुकानात आधार कार्ड सोबत घेऊन जात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसिलदार (Tehsildar) डॉ. संतोष यावलीकर यांनी केले आहे.
शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी…
शासन अन्न धान्य वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी आपल्या गावातील किँवा नजीकच्या परिक्षेत्रात रास्त भाव धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडीग करून घ्यावयाचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असुन ई-केवायसी (E-KYC) पूर्ण झाल्यावरच आगामी काळात लाभार्थी सदस्याला धान्य मिळणार आहे. प्रत्येक धान्य दुकानात ई-केवायसी प्रक्रिया निःशुल्क सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीनवर (POS Machine) अंगठ्याचा ठसा देवून शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी. ज्या सदस्य लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे धान्य बंद होणार आहे. तरी तालुक्यातील शिधापत्रिका (Ration Card) धारक कुटुंबातील प्रत्येक लाभार्थी सदस्यांनी के वायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे.