पुढारी वृत्तसेवा : सील्लोड तालुक्यातील खूपटा गावातील ३८ वर्षीय समाधान रायभान काळे या युवकाने सततची नापिकी, मराठा समाजाला अनेक मोर्चे आंदोलने, उपोषणे करून आरक्षण मिळत नसल्याने स्वतः च्या शेतातील शेततळ्यात उडी घेवून आपली जीवनयात्रा सपविली. दि.३१रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घरातून कुणालाही न सांगता निघून गेले. सकाळ झाली तरी अजून घरी आले नाही म्हणून नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र समाधान कुठेच आढलून न आल्याने त्यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात पायातील चप्पल तरंगत असल्याचे दिसून आले.
शेत तळ्यात पाणी खूप असल्याने मृतदेह बाहेर काढायला अडचण येत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथून अग्नीशामक दलाच्या रेस्क्यू टीम ला बोलवून मृतदेह गळाच्यासाह्याने बाहेर काढण्यात आला. शव विच्छेदन करण्यासाठी प्रेत अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पंचनामा करीत असताना समाधान यांच्या खिशात सुसाईट नोट मिळून आली. त्यामधे लिहून ठेवले होते, नपिकी, शेकडो मोर्चे, आंदोलने करुनसुद्धा मराठा समाजाला न मिळणारे आरक्षण व सरकार मराठा समाजाची करीत असलेली फसवणूक या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. आता तरी सरकारने डोळे उघडून गरजवंत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. एक मराठा लाख मराठा असे अशा आशयाची चिठ्ठी मिळून आल्याने मराठा समजातून रोष व्यक्त होत आहे.