Published on
:
02 Feb 2025, 2:18 pm
Updated on
:
02 Feb 2025, 2:18 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वाद झाल्याचा दिसून आले. त्यामुळे या स्पर्धेला गालबोट लागले. गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे व पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात मोहोळ याने राक्षे याचा पराभव केला. पण राक्षे याने यावर आक्षेप घेतला.
राक्षे याने पंचानी चुकीचा निर्णय घेतला आहे. रिपल्पे बघून पुन्हा कुस्ती लढवावी अशी मागणीही केली. आक्रमक झालेल्या राक्षे याने पंचाची कॉलर धरली व लाथही मारली यानंतर खूप वेळ मैदानात गोंधळ सुरु होता. शेवटी पंचाचा निर्णय अंतिम राहिल असे कमिटीने सांगितले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राक्षे याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण राक्षे खूपच आक्रमक झाला होता.