Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी लातूर कडकडीत बंद

2 hours ago 2

जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद : सुरक्षेस्तव शाळा-महाविद्यालये ठेवली बंद

लातूर (Maratha preservation Latur Bandh) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून आंतरवली सराटी येथे उपोषणास बसलेले मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल (Maratha reservation) मराठा समाजाच्या वतीने सोमवारी पुकारलेल्या लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेआठच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व त्यानंतर शहरभर आंदोलकांनी मोटारसायकल फेरी काढत बंदचे आवाहन केले. त्यामुळे (Latur Bandh) लातूर शहर दिवसभर कडकडीत बंद होते.

Maratha reservation
एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षणाचा बालेकिल्ला लातूर जिल्हा लातूर जिल्हा अशा घोषनांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. या बंदबाबत पूर्व कल्पना देण्यात आल्याने दुकाने उघडण्यात आली नव्हती. शाळा- महाविद्यालये कडकडीत बंद (Latur Bandh) होती. एरवी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या ट्यूशन परिसरात शुकशुकाट होता. मार्केट यार्ड परिसरातही असेच चित्र होते. शहराचे हद्य समजल्या जाणाऱ्या गंजगोलाईतील व्यवहार ठप्प होते. कापड लाईन, भुसार लाईन सराफा बाजार येथेही शुकशुकाट होता. मराठा आंदोलकांच्या सतत शहरात मोटारसायकल फेऱ्या सुरू होत्या. गंजगोलाईतील जगदंबा मंदिरासमोर रस्त्यावरच बराच काळ (Maratha reservation) मराठा बांधवांनी बैठक दिली होती. मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करुनही सत्ताधारी व विरोधी हा विषय गांर्भियाने घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे, निजाम गॅझेटीअर लागू करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलनास येताना सर्व समाजबांधवांनी जेवनाचे डबे आणले होते. दुपारी गंजगोलाईत सर्वांनी डबे एकत्र केले व गोपाळकाला म्हणून त्याचे समुह भोजन केले. या (Latur Bandh) बंदचा समारोप गंजगोलाईतील जगदंबेस आरती करुन झाला. यावेळी जंगदंबेस समाजबांधवांनी मनोज जरांगे पाटलांना उत्तम आरोग्य अन सरकारला (Maratha reservation) मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची सदबुध्दी दे अशी प्रार्थना केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article