Market Update: चांगला दर मिळूनही बटाटा वाणाच्या मागणीत घट

2 hours ago 1

चांगला दर मिळूनही बटाटा वाणाच्या मागणीत घटPudhari

पुढारी वृत्तसेवा

Published on

16 Oct 2024, 11:26 am

Updated on

16 Oct 2024, 11:26 am

देशात सर्व बाजारपेठेत बटाट्यास चांगला भाव मिळत असतानाही बटाटा वाणाच्या मागणीत गत तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे चित्र मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे. हवामान बदल व शेतीला विश्रांती नसल्याने बटाटा उत्पादनात घट होत असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

या वर्षी पुणे जिल्ह्यात बटाटा हंगाम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला. राज्यातील व देशातील इतर विभागांच्या आधी आपलाच बटाटा बाजारात आणण्यासाठी हंगाम पूर्व बटाटा लागवड या भागात वाढली आहे.

परंतु हवामानाचा लहरीपणा व उष्ण हवामानात बटाटा लागवड वाढल्याने तसेच सिंचन सुविधेमुळे दोन पिकांत योग्य कालावधीचे अंतर ठेवले जात नाही. शिवाय एकाच वर्षात जास्त पिके घेण्याच्या पध्दतीमुळे पुणे जिल्ह्यात बटाटा उत्पादन कमी होत आहे. या वर्षी भारतात कांद्याप्रमाणे बटाट्याचे भाव वाढल्याने बटाटा वाणाचे दर जास्त आहेत.

बटाटा लागवडीसाठी मोठा खर्च होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये बटाटा लागवडीसाठीची उत्सुकता कमी आहे. यंदा मान्सून लांबल्याने तसेच परतीचा पाऊस अद्याप पडत असल्याने बटाट्यानंतर कांदा किंवा अन्य पिकांना उशीर होणार असल्यामुळेही मंचर बाजारपेठेत बटाटा वाणाला अतिशय कमी मागणी आहे.

या शिवाय मध्यप्रदेशातील इंदोर परिसरातील बटाटा पावसामुळे नष्ट झाल्याने तसेच खरीप हंगामातील सातारा, पुणे, नगर जिल्ह्यांतील व कर्नाटक राज्यातील बटाटा काढणीत सलग ढगाळ हवामानामुळे तसेच प्रचंड पावसामुळे बटाटा उत्पादन घटले आहे.

रब्बी हंगामात आगाद बटाटा लागवड घटल्याने नवा बटाटा बाजारात येण्यास मोठा कालावधी लागणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील अल्प प्रमाणात लागवड झालेल्या बटाटा उत्पादकांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

- संतोष पोखरकर, अध्यक्ष, मंचर आडत व्यापारी असोसिएशन

या वर्षी मंचर मार्केटमध्ये दर्जेदार पंजाब बटाटा वाणाचे दर मोठी साइज गोळी बटाटा तीन हजार व लहान साइज बटाटा 3500 प्रतिक्विंटल आहे. पंजाबचे कमी प्रतिचे व अन्य राज्यातील बटाटा गोळी वाणाचे दर 2600 ते 2900 प्रतिक्विंटल आहेत. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व गुजरात येथील बटाटा राज्यातील बाजारपेठेत येत आहेत. त्याचे दर वाजवी असूनही त्या बटाटा वाणास मागणी कमी आहे.

- सचिन पानसरे, उपसभापती, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article