आज मध्यरात्रीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. Pudhari Photo
Published on
:
16 Oct 2024, 1:29 pm
Updated on
:
16 Oct 2024, 1:29 pm
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी माझ्याकडे ८०० पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते. त्या सर्वांना उद्या (दि.१७) तातडीने अंतरवाली सराटीत बोलावले आहे. उद्या सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्या सर्व इच्छुकांना निवडणुकीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितले आहे. त्यानंतर रविवारी (दि. २०) अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीतच लढायचं की पाडायचं याचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि. १६) येथे दिली. (Maharashtra Assembly Elections 2024)
ते पुढे म्हणाले की, या बैठकीत समाजाचा जो निर्णय होईल, त्यास माझा पाठिंबा असेल. मी माघारी घेणार नाही. या बैठकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे, हा निर्णय घेण्यात येईल. सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही बैठक होईल.