महायुतीत शिंदे, पवारांसह भाजपनेही त्याग केला:प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य, कामठीतून लढणार नसल्याचे केले स्पष्ट

1 hour ago 1
आपण कामठी मतदारसंघांतून लढणार नाही, पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणार, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपनेही त्याग केला, असेही ते म्हणाले. बावनकुळे विधान परिषदेचे सदस्य आहेत. कामठीत भाजपचे टेकचंद सावरकर विद्यमान आमदार आहे. 2019 मध्ये बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे यावेळी बावनकुळे कामठीतून लढणार का, या विषयी उत्सुकता होती. मात्र बावनकुळे यांनी आपण कामठी विधानसभा मतदार संघात उमेदवारी मागितली नाही आणि मागणार नाही, असे सांगितले. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणार. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी सांभाळत राज्यात महायुतीची सत्ता आणणण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंनी मोठे मन करुन भाजपला पाठिंबा द्यावा कोणाचा त्याग किती मोठा आहे हे मोजता येत नाही हे खरे आहे. मात्र राज्याला आज महायुतीची गरज आहे. त्यामुळे काही बाबतीत त्यांनी मोठे मन करुन भाजपला पाठिंबा द्यावा. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांनी जास्त जागा लढल्या पाहिजे, असे नाही. मात्र जिथे तिघांपैकी ज्यांचे प्राबल्य आहे आणि उमेदवार सक्षम आहे, त्या ठिकाणी त्यांचा विचार झाला पाहिजे. महायुतीमधील ताणतणाव निवडणुकीच्या काळात परवडणारे नाही. महायुती एकत्रित राहणार असून ती जिंकण्यासाठी लढणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले. शिंदे, पवार यांच्यासह भाजपचाही त्याग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल मला माहिती नाही. मात्र महायुतीत एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपनेही त्याग केला आहे. सर्वाधिक आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे कोणी किती मोठा त्याग केला हे महत्त्वाचे नाही. तर महायुतीचे नुकसान होवू नये यासाठी तीनही नेत्यांनी समन्वय ठेवत आणि मोठे मन करीत आमच्या पाठिशी त्यांनी उभे राहिले पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article