Published on
:
18 Nov 2024, 5:19 am
Updated on
:
18 Nov 2024, 5:19 am
माथेरान : माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यापासून त्यास पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध झालेल्या या वाहतुकीच्या पर्यायाला पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे परंतु अपुर्या रिक्षांमुळे पर्यटकांना तासंतास रिक्षाची वाट पहावी लागत आहे.
माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यापासून पर्यटनाचे एक वेगळे पर्व सुरू झाले असून अगदी स्वस्तात मिळणार्या या सेवेचा अनेक पर्यटन आवर्जून लाभ घेत आहे परंतु या ठिकाणी फक्त 20 ई रिक्षा सुरू आहेत ज्या येथे येणार्या पर्यटकांची संख्या पाहता अपुरी आहे. आज रविवार असल्याने माथेरानमध्ये अनेक पर्यटक दाखल होत होते. त्याचप्रमाणे येथून परत जाणार्या पर्यटकांची संख्या ही जास्त असल्याने येथील रिक्षा स्टँडवर पर्यटकांच्या लांबच्या लांब रांगा पाहावयास मिळत होत्या.
आज शाळेला सुट्टी असल्याने सर्व रिक्षा पर्यटकांच्या दिमतीस हजर होत्या परंतु शाळा सुरू झाल्यानंतर अर्ध्या रिक्षा शाळेसाठी वापरल्या जातात त्यावेळी पर्यटकांना तासंतास रिक्षाची वाट पाहावी लगते त्यामुळे या रिक्षांची संख्या लवकरात लवकर वाढवावी, अशी सातत्याने मागणी होत असतानाही शासन या मागणीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्या शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.