Published on
:
18 Nov 2024, 7:36 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:36 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बारा दिवसांपासून सुरू असलेली विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता थांबणार आहे. त्यानंतर गुप्त बैठकांवर उमेदवारांचा भर राहील. तर दुसरीकडे शेवटच्या टप्प्यात राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवर निवडणूक पथकांची बारीक नजर राहणार आहे.
जिल्ह्यातील नका विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नऊ मतदारसंघात एकूण १८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, गेल्या ५ नोव्हेंबरपासून या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. जाहीर सभा, कॉर्नर बैठका, रॅली आदींनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप प्रत्यारोपांमुळेही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गेल्या आठवड्यात शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उसाठाचे प्रमुख ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा पार पडल्या. तर सिने अभिनेता गोविंदा आहुजा याने शहरातील काही उमेदवारांसाठी रॅली काढली. उमेदवारांच्या प्रचाराचे गाणे वाजवत भोंगे लावलेले अ टिोरिक्षा गल्ल ोगल्ली फिरत ताई, माई, अक्का म्हणत आपल्याच उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आता गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेली ही रणधुमाळी उद्या सोमवारी सायंकाळी थांबणार आहे.
निवडणूक आयोगाने निर्देशानुसार सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रच उद्धब ाराची मुदत संपत आहे. त्यानंतर गुप्त भेटीगाठींवर उमेदवारांचा भर राहण्याची चिन्हे आहेत. या काळात पैशांचा वापर होऊ शकती ही शक्यता गृहीत धरून निवडणूक विभागाची भरारी पथके अलर्ट करण्यात आली आहेत. उमेदवार आणि त्यांचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या हालवालींवर बारीक लक्ष या पथकांकडून ठेवले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मतदारसंघनिहाय उमेदवार
मतदारसंघ उमेदवार संख्या
सिल्लोड २४
कन्नड १६
फुलंब्री २७
औरंगाबाद मध्य २४
औरंगाबाद पश्चिम १८
औरंगाबाद पूर्व २९
पैठण १७
गंगापूर १८
वैजापूर १०
एकूण १८३
प्रचाराचा ब्लॉकबस्टर संडे
सभा, बैठका, रॅलीव्दारे उमेदवारांची गल्लोगली पायपीट
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी दोनच दिवस राहिले असून १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यापूर्वीचा शेवटचा रविवार (दि. १७) हा प्रचाराच्या दृष्टीने ब्लॉकबस्टर ठरला. जिल्ह्यातील मतदारसंघात दिवसभर प्रचाराची धूम राहिली. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा सकाळपासून प्रचार रॅली, लहान-मोठ्या सभा आणि कॉर्नर बैठकांचा धडाका राहिला. सायंकाळी उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला.
रात्री उशिरापर्यंत गल्लोगली अनेकांची पायपीट सुरू होती, राज्यात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू आहे. निवडणुकीच्या मैदानात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अनेक अपक्षांनीही दंड थोपटले आहेत. तर काही बंडखोरांचेही आव्हान आहे. या उमेदवारांकडून गेल्या दोन आठवडांपासून लहान-मोठ्या सथा, रॅली, पदयात्रा, कॉर्नर बैठकांव्दारे प्रचार सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. १८ नोव्हेंबरही प्रचाराची शेवटची तारीख आहे. त्यामुळे प्रचाराने वेग घेतला आहे.
मतदानापूर्वीचा शेवटचा रविवारी असल्याने सर्वच उमेदवार अभी नहीं तो कभी नहीं या विचाराने प्रचाराला भिडले. तशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्यामुळे अनेकांच्या प्रचार कार्यालयावर सकाळपासूनच लगबग सुरू होती. दिवसभरात मतदारसंघातील विविध भागांत लहान-मोठ्या सभा, प्रचार रॅलीची घूघुम सुरू होती.
प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याची धडपड
प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने रविवारी सकाळपासून उमेदवारांची लगबग सुरू होती. सुट्टीचा दिवस असल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचे नियोजन करून उमेदवार घराबाहेर पडले. वाहन रॅली, पदयात्रा, घरोघरी जाऊन भेटी देण्यास उमेदवारांनी प्राधान्य दिले. पायात भिंगली बांधली असे उमेदवार आणि त्यांच्या मागे कार्यकर्ते मतदारसंघातील गल्लोगल्ली प्रचार करत फिरत होते.
रात्री उशिरापर्यंत बैठकांचा धडाका
प्रचारासाठी दिवसभरात ठिकठिकाणी पदयात्रा, रॅली काढून उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. रविवार हा प्रचाराचा सुपर सन्डे असल्याने उमेदवारांनी अगदी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची नाश्त्यापासून सोय केली होती. दुपारी घाईगडबडीत जेवणानंतर रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचाराचे नियोजन करत बैठकांचा धडाका सुरू होता.