जळगावात गोळीबारानंतर प्रशासन अलर्ट मोडवर

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

18 Nov 2024, 9:10 am

Updated on

18 Nov 2024, 9:10 am

जळगाव | जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञाताकडून पहाटे 4 वाजता गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक, सामान्य पोलीस निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्या घटनेची सखोल चौकशी होत आहे.

अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या पहाटे चार च्या सुमारास ते झोपलेले असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि तपासणी केल्यावर त्यांना दिसले की काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाला आहे आणि गोळ्यांचे छिद्र सापडले आहेत.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि चौकशी केली असता रस्त्यावर तीन रिकामी काडतुसे आढळून आली. झडतीदरम्यान खोलीत एक गोळी सापडली. खोलीचा शोध सुरू आहे.

शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे AIMIM चे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना अधिकृत मिळाली नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या घटनेबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात असून पहाटे ३:४२ वाजता त्याच्या घराजवळ एक मोटारसायकल आढळून आली.

त्या संदर्भातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article