लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदा विधानसभा निवडणुकीत देखील बारातमी हा मतदारसंघ चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या हायप्रोफाईल लढतीत बारामती हा मतदारसंघ पहिला उल्लेखला जातो कारण यंदा लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही पवार विरूद्ध पवार असा सामना रंगत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आज शेवटचा दिवस आहे. अवघ्या काही तासांनी आज विधानसभेचा प्रचार थांबणार आहे. आज शेवटच्या दिवशी बारामतीत काका आणि पुतण्याची तोफ धडाडल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या सांगता सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदा विधानसभा निवडणुकीत देखील बारातमी हा मतदारसंघ चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या हायप्रोफाईल लढतीत बारामती हा मतदारसंघ पहिला उल्लेखला जातो कारण यंदा लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही पवार विरूद्ध पवार असा सामना रंगत आहे. बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार मिशन हायस्कूलच्या मैदानावर सांगता सभा घेत आहेत, तर युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीतील लेंडीपट्टी मैदानावर शरद पवारांची सांगता सभा होत आहे. दरम्यान, आजच्या बारामतीतील अजित पवार यांच्या सांगता सभेला अजित दादांच्या आई आशाताई पवार या देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Nov 18, 2024 05:09 PM