भाजप विरोधातला प्रचार मध्य नागपूरचे गणित बिघडविणार?
नागपूर (Nagpur Assembly Elections) : मध्य नागपूरमध्ये एक भाजप विरोधात एक वेगळाच प्रचार आता नव्याने सुरू झाला आहे. (MLA Praveen Datke) प्रवीण दटके मध्य नागपुरातील रहिवासी आहेत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेतच. मग नव्या उमेदवाराला संधी दिली तर मध्य नागपूरचे रहिवासी असलेले दोन दोन आमदार मिळतील, या प्रचाराने मध्य नागपुरातील भाजप उमेदवाराची झोप उडाली आहे.
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात (Nagpur Assembly Elections) भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून प्रवीण दटके (MLA Praveen Datke) रिंगणात आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीचे बंटी शेळके (Bunty shelke) हे उमेदवार आहेत. या मतदारसंघात हलबा आणि मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. यावेळी मविआ किंवा महायुतीने हलबा समाजातील उमेदवार न दिल्याने रमेश पुणेकर यांना समाजाचा उमेदवार म्हणून उभे करण्यात आले आहे. या भागातील बहुतांश हलबा समाज हा आतापर्यंत भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे.
यापूर्वीचे आमदार हे भाजपचे होते आणि हलबा समाजाचे होते. यावेळी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने हलबा उमेदवार न दिल्याने समाजात रोष आहे. पुणेकर यांच्या रूपाने समाजाने उमेदवार दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. (Nagpur Assembly Elections) मुस्लिम मते काँग्रेसकडे जाण्याचीच शक्यता अधिक असल्याने भाजप उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातल्या त्यात आता मध्य नागपूरला दोन आमदार मिळणार, असा प्रचार सुरू झाल्याने भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. उद्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. २० ला मतदान आहे. ‘दोन आमदार’ हा प्रचार प्रभावी ठरला तर भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरेल, असे बोलले जात आहे.
प्रियंका गांधीच्या रोड शो मधील राडा काँग्रेसला फायदेशीर
रविवारी (Nagpur Assembly Elections) नागपुरात काँग्रेस उमेदवार बंटी शेळके (Bunty shelke) यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या रोड शो मध्ये भाजपचे कार्यकर्ते घुसले. भाजपचे झेंडे फडकवले. घोषणा दिला. प्रियंका गांधी यांनी नम्रपणे त्यांना शुभेच्छा दिला. काही दिवसांपूर्वी श्याम मानव यांच्या सभेतही भाजपने राडा केला. हे सारे प्रकार काँग्रेस साठी पोषक ठरत आहे. लोकशाही मूल्याच्या विरोधात भाजप हे प्रकार करत असल्याचा प्रचार करण्यात काँग्रेस कमालीची यशस्वी ठरली आहे.