Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी नात्यांमध्ये लढत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण त्या ठिकाणी पती आणि पत्नीमध्ये लढत होत आहे. या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि शिवसेना उमेदवार संजना जाधव आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत होत आहे.
संजना जाधव यांना आश्रू अनावर
कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या हर्षवर्धन जाधव – संजना जाधव अशी लढत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांना भाषणावेळी अश्रू अनावर झाले. कन्नडमधील एका गावात भाषणात त्यांनी नवऱ्याकडून काय सोसले हे सांगितले. त्यावेळी त्यांना रडू कोसळले. संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांची ती मुलगी आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न केल्यानंतर काय काय सोसले? हे सांगायला त्यांनी सुरुवात करताच डोळ्यातून पाणी आले. त्यांना थोडा वेळ भाषण थांबावावे लागलं. संजना जाधव यांना रडू कोसळले.
हे सुद्धा वाचा
मुलीचा बाप होता म्हणून गप्प
मी गावात सून म्हणून आले. परंतु गावाने मुलीसारखे प्रेम दिले. माझ्यावर अनेक संकटे आणि माझ्यावर अनेक अत्याचार झाले, पण मी बोलून दाखवले नाही. कारण ती आपली संस्कृती नाही. मी लग्न होऊन एका महिन्यात आल्यावर वडिलांना सर्व सांगितले. परंतु वडील म्हणाले, मुल झाले की हा व्यक्ती सुधरेल. परंतु सुधारणा झाली नाही. त्यानंतर वडील म्हणत होते, ४० झाली की हा व्यक्ती सुधरेल. परंतु तो व्यक्ती सुधारला नाही. माझ्या ठिकाणी कोणास आणले, हे तुम्हाला माहीत आहे. माझी जागा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ती जागा घेता आला नाही, असे सांगताना संजना जाधव यांना रडू कोसळले. एका मुलीच्या बापने हे सर्व सहन केले. परंतु मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उतरला असता.
नवऱ्याकडून कसा झाला छळ, शिवसेना उमेदवारास सभेत बोलताना रडू कोसळले pic.twitter.com/OFORp7aDTg
— jitendra (@jitendrazavar) November 18, 2024
माझ्यावर वडिलांवर अनेक आरोप झाले. परंतु वडील शांत राहिले. कारण वडिलांना माहीत होते आपली मुलगी त्या ठिकाणी नांदत आहे. आता माझ्यावर ते घाणेरडी भाषा वापरत आहे. मी संघर्ष करत आहे. परंतु माझी संघर्ष करण्याची ताकद आता संपली आहे. आपण मला या संघर्षातून बाहेर काढा. माझ्या भावना दाटून आल्या आहेत, त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही.