नाशिकच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमधून 5 कोटीची कॅश जप्त:तपास सुरू, सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे पैसे असल्याची चर्चा
1 hour ago
1
नाशिकच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमधून 5 कोटीची कॅश जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असल्याची चर्चा सुरू आहे. नेमकी हे पैसे कुणाचे आहेत, एवठ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बरोबर का बाळगली या बद्दल अजून काही माहिती समोर आली नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे. दरम्यान ज्या गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे ती एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची असल्याचे बोलले जात आहे. 40 जणांचे निवडणूक आयोगाचे पथक गेली दोन तास तपास करत आहे. ज्या हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली तिथे सहा रूम सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नावावर बुक आहेत. हा पैसा इलेक्शन फंड असल्याचे माहिती समोर येत आहे. काही कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. दोन दिवसांनपूर्वीच नाशकात पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप अन् ठाकरे गटाच्या समर्थकांत तुंबळ हाणामारी साली होती. यानंतर है पेसे सापडल्याने चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमध्ये पैसे वाटपावरुन राडा
दोन दिवसांपूर्वी नाशिक पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ रॅली सुरू होती. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॅलीत शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते मविआचे कार्यकर्त्यांकडून पैसे वाटत होत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर राहुल ढिकले यांचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. यानंतर दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)