MI IPL 2025 Full Squad : मुंबईची ताकद दुप्पट, 2 घातक गोलंदाजांचा समावेश, एकूण 23 खेळाडू, कुणाला किती रक्कम?

2 hours ago 1

trent boult jasprit bumrah and deepak chahar mumbai indians ipl 2025Image Credit source: mumbai indians x account

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिली सर्वात यशस्वी टीम मुंबईने मेगा ऑक्शन 2025 मधून एकूण 18 खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. मुंबईने मेगा ऑक्शनमधून तगडे खेळाडू घेतले आहेत. ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याला मुंबईने आपल्यात घेतले. मुंबईने त्याआधी महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवलं होतं. मुंबई फ्रँचायजीने 18 खेळाडूंमध्ये कुणाचा समावेश केलाय आणि त्यांच्यावर किती रक्कम खर्च केली? मेगा ऑक्शननंतर मुंबईची टीम कशी आहे? हे आपण जाणून घेऊयात.

प्रत्येक टीमला ऑक्शनसाठी 120 कोटी रक्कम देण्यात आली होती. तर जास्तीत जास्त 6 खेळाडू रिटेन करण्याची अट होती. मुंबईने एकूण 5 खेळाडू रिटेन केले होते. त्यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या, माजी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचा समावेश होता. त्यामुळे मुंबईच्या 120 कोटींमधून 75 कोटी रक्कम ही रिटेन केलेल्या 5 खेळाडूंवर खर्च झाली. त्यामुळे मुंबईकडे मेगा ऑक्शनसाठी 45 कोटी रक्कम शिल्लक होती. मात्र मुंबईतून या रक्कमेतून मस्त खरेदी केली. मुंबईने मेगा ऑक्शनमधून 18 खेळाडू आपल्या ताफ्यात घेतलं. अशाप्रकारे मुंबईच्या ताफ्यात एकूण 23 खेळाडू झाले आहेत.

मुंबईची बॉलिंगची ताकद दुप्पट

मुंबईने दीपक चाहर याच्यासाठी 9 कोटी 25 लाख रुपये मोजून घेतलं. चेन्नईसाठी खेळणारा हा गोलंदाज आता पलटणकडून खेळणार आहे. त्यामुळे मुंबईची ताकद आणखी वाढली आहे. तसेच ट्रेन्ट बोल्टमुळे मुंबईच्या बॉलिगंला आणखी बूस्टर मिळणार आहे. ट्रेन्टची 3 वर्षांनी मुंबईत घरवापसी झाली आहे. मुंबईने बोल्टसाठी 12.50 कोटी खर्च केले. बोल्टने गेल्या 3 हंगामात राजस्थानचं प्रतिनिधित्व केलं.

पहिला यशस्वी संघ

दरम्यान मुंबई आयपीएल इतिहासातील पहिला सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत गेल्या 4 मोसमात मुंबईला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता मेगा ऑक्शनंतर नवा संघ पलटणला गतवैभव प्राप्त करुन देणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईचे 23 भिडू

𝐂𝐋𝐀𝐒𝐒 𝐎𝐅 2⃣0⃣2⃣5⃣✨💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPLAuction pic.twitter.com/JwwPnqPyrd

— Mumbai Indians (@mipaltan) November 25, 2024

रिटेन खेळाडू आणि किंमत

  1. जसप्रीत बुमराह ( 18 कोटी)
  2. हार्दिक पंड्या (16.35 कोटी)
  3. सूर्यकुमार यादव (16.35 कोटी)
  4. रोहित शर्मा (16.30 कोटी
  5. तिलक वर्मा (8 कोटी)

नवे खेळाडू आणि त्यांची किंमत

  1. ट्रेन्ट बोल्ट : 12.5 कोटी
  2. दीपक चाहर : 9.25 कोटी
  3. विल जॅक्स : 5.25 कोटी
  4. नमन धीर : 5.25 कोटी (RTM)
  5. अल्लाह घझनफर : 4.80 कोटी
  6. मिचेल सँटनर : 2 कोटी
  7. रायन रिकल्टन : 1 कोटी
  8. लिज्जाड विलियम्स : 75 लाख
  9. रीस टॉप्ली : 75 लाख
  10. रॉबिन मिंझ : 65 लाख
  11. कर्ण शर्मा : 50 लाख
  12. विग्नेश पुथुर : 30 लाख
  13. अर्जुन तेंडुलकर : 30 लाख
  14. बेवन जॅकब्स : 30 लाख
  15. वी. सत्यनारायण : 30 लाख
  16. राज अंगद बावा : 30 लाख
  17. केएल श्रीजीत : 30 लाख
  18. अश्वनी कुमार : 30 लाख

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article