Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

2 hours ago 1

मुंबई (Mithun Chakraborty) : बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे. मिथुन दा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे. (National Film Awards) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. ‘मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, (Dadasaheb Phalke Award) दादासाहेब फाळके निवड ज्युरीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.’ सध्या वैष्णव यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Delighted that Shri Mithun Chakraborty Ji has been conferred the prestigious Dadasaheb Phalke Award, recognizing his unparalleled contributions to Indian cinema. He is simply a taste icon, admired crossed generations for his versatile performances. Congratulations and champion wishes to… https://t.co/aFpL2qMKlo

— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2024

8 ऑक्टोबर रोजी 70 व्या (National Film Awards) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) मिथुन दा यांना प्रदान करण्यात येणार आहे. असं देखील अश्विनी वैष्णव यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यांच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत (Mithun Chakraborty) मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी फक्त अभिनयात नाही तर, ऍक्शन आणि डान्समध्ये देखील माहिर आहेत. शिवाय त्यांनी वेग-वेगळ्या भाषांच्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मिथुन दा यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी भाषेत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर मिथुन चक्रवती (Mithun Chakraborty) यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘दो अंजाने’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मिथुन दा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘तेरे प्यार में’, ‘प्रेम विवाह’, ‘हम पांच’, ‘डिस्को डान्सर’, ‘हम से है जमाना’, ‘घर एक मंदिर’, ‘अग्निपथ’, ‘तितली’, ‘गोलमाल 3’, ‘खिलाडी 786’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article