‘ग्रिप’ नसलेल्या टायरमुळे बस खाईत आदळली
निर्वाणीवर तणावपूर्ण शांततेत अंत्यसंस्कार
बसचे दोषपूर्ण टायर ठरले अपघातासाठी ‘कारण’ ट्रॅव्हल्स मालकाला हिंगणा पोलिसांनी दिले अभय
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur Accident) : शंकरनगरस्थित सरस्वती विद्यालयाची सहलीकरिता जाणारी बस मंगळवारी वळण रस्त्यावर अचानक उसळून खाईत आदळली होती. यात एका विद्यार्थीनीचा मृत्यू तर ४६ विद्यार्थ्यासह काळजीवाहक व शिक्षक असे एकूण ४९ जण जखमी झाले. या (Nagpur Accident) प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या अपघाताच्या घटनेनने आता धक्कादायक वळण घेतले आहे. याबसच्या चाकाचाटायरदोषपूर्णच नव्हे तर पूर्णतः ‘प्रिप’ घासलेला होता. ही गंभीर बाब बस खाईत आदळून झालेल्या अपघातासाठी कारण ठरल्याचे म्हटले जाते.
हे बघा: विद्यार्थ्यांची सहल आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात..!
ही (Nagpur Accident) अपघाताची घटना हिंगणा सेलू मार्गावरील देवळी पेंढरी या गावाजवळील वळनमार्गावर मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. निर्वानी शिवानंद बागडे (१७) रा. टाकळी सिम, हिंगणा रोड, असे मृतक विद्यार्थीनीचे नाव आहे. विद्यार्थ्यांसह ४९ जण जखमी झाले होते. सर्व विद्यार्थी हे १५ ते १६ वर्षाचे असून ९ बसच्या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी आणि एक शिक्षिका सध्या उपचारासाठी एम्समध्ये दाखल आहेत. यांच्यापैकी दोन मुलांवर गुरुवारी (ता. २८) शस्त्रक्रिया होणार आहे. एका मुलाच्या हातामध्ये तर दुसऱ्या मुलाच्या पायावर शस्त्रक्रिया होईल, अशी माहिती आहे.
दोन विद्यार्थ्यांवर होणार आज शस्त्रक्रिया
बसमध्येएक शिक्षिका, शारीरिक शिक्षक, काळजीवाहक यांच्यासह ५२ विद्यार्थी होते. यातील अनेक विद्यार्थ्यांना एम्स आणि निम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बुधवारी (ता. २७) एम्समध्ये ५ जण आणि निम्समध्ये ६ विद्यार्थी वगळता ३३ जणांना सुटी देण्यात आली. (Nagpur Accident) सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे, असे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी (ता. २७) एम्समध्ये एका विद्यार्थ्याच्या मूत्रपिशवीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्या विद्यार्थ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रक्तस्राव थांबल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्याने आपल्या पालकांशी संवाद साधला. पालकानी डॉक्टरांचे आभार मानले. दाखल असलेल्या शिक्षिकेच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली असून त्यांना सध्या अतिदक्षता विभागात अस्थिरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहेत.
आरोपी करीत नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. वळण मार्गावर अचानक बस उसळली कशी? आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खाईत आदळली कशी? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला असतांना आता टायरचे पूर्णतः ग्रिप घासलेले असल्याची बाब समोर आली आहे. ट्रॅव्हल्स बसचा मालक हा आर्थिक फायदासाठी एका बसवर दोन चालक न ठेवता एकाच चालकाकडून काम करून घ्यायचा.
बसच्या अपघातात निर्वाणी शिलानंद बागडे ही विद्यार्थीनी ठार झाली होती. बुधवारी पुण्यातील नातेवाईक आल्यानंतर तिच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता टाकळी सीम येथून अंबाझरी घाटावर नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्वाणीच्या नातेवाईकांनी या (Nagpur Accident) घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे अंत्यसंस्कारादरम्यान शोकाकूल वातावरण आणि तणावपूर्ण शांतता होती. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता.
आरटीओकडून परमिट मिळाले नव्हते. बसचा टॅक्स सुद्धा भरलेला नव्हता. सहलीकरीता उपयोगात आणलेल्या या बसमधील प्रवाशांचा विमा सुद्धा काढला नव्हता. झोप होत नव्हती. ४३ प्रवाशी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बसमध्ये अवैधरित्या अतिरिक्त दोन सिट लावल्या होत्या. या (Nagpur Accident) बसमध्ये एकूण ४३ ऐवजी ४५ प्रवासी सिट होत्या. आरटीओकडून नॉन एसी बस एसी बस असल्याचे हा ट्रॅव्हल्स मालक दाखवितो. तसेच बसमधील इमरजन्सी दरवाजा मोकळा असणे आवश्यक होते. मात्र याठिकाणी बस आरटीओकडून पासिंग होताच त्या जागी अवैधरित्या अतिरिक्त प्रवासी बसण्यासाठी सिट लावली होती. बसमध्ये अग्निशमन यंत्रणा नव्हती. एवढेच नव्हे तर बसमध्ये वैद्यकीय किटसुद्धा व्यवस्थित नव्हती. त्यातील प्रथमोपचाराचे साहित्य मुदतबाह्य होते.
यावरून केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रॅव्हल्स मालक हा मंगळवारी देशाचे भावी असे उज्ज्वल भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्याची बाब अपघातावरुन स्पष्ट झाली असे असूनही हिंगणा पोलिस आरोपी ट्रॅव्हल्स मालकाला वाचवित असलयाचा आरोप संतप्त पालकांनी केला आहे. दुसरीकडे सदर प्रकरण पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी गांभिर्याने घेतले आहे, हे विशेष. ८ वी ते १० वीचे विद्यार्थी होते. ते बसने वर्धा येथील बोरधरणला सहलीला जात होते. (Nagpur Accident) याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे या संपूर्ण अपघातासाठी जबाबदार असलेला आरोपी टॅव्हल्स मालकाला पोलिसांनी अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.