Published on
:
28 Nov 2024, 11:34 am
Updated on
:
28 Nov 2024, 11:34 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने रस्त्याच्या कामासाठी स्थलांतरित केलेली १२०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी तीन ठिकाणी जोडणीचे काम बुधवारी (दि. २७) रात्री उशिराने पूर्ण इाले. रात्री उशिराने शहराच्या दिशेने पाणीपुरवठा सुरू केला जाणार असून जलवाहिनी भरण्यास किमान बार तासांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर शहरातील जलकुंभात पाणी दाखल होईल. त्यामुळे पाण्यासाठी तब्बल दोन दिवसांपासून भटकंती सुरू असलेल्या शहरवासीयांना आज गुरुवारी ५२ तासांनंतर पाणीपुरवठा होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पैठण ते छत्रपती संभाजीनगर या सत्याचे चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी शहराला पाणीपुरवठा करणारी बाराशे मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्यात आली आहे. जलवाहिनी स्थलांतरित केली असली तरी या जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन जोडणी शिल्लक असल्यामुळे हे काम करण्यासाठी ४८ तासांचा खंडणकाळ (शटडाऊन) घेण्यात आला. मंगळवारी सकाळी ९ बाजेपासून शहराचा पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर गेवराई गाव, कवडगाव, डोरकीन या तीन ठिकाणी जलवाहिनी जोडणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी दिवसभर खोदकाम करून जलवाहिनी जोडणीसाठी बेल्डिंगचे काम सुरू केले. आज बुधवारीही हे काम सुरूच होते. रात्री उशिराने तिन्ही ठिकाणी जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण करण्यात आले.
मध्यरात्रीपासून जलवाहिनी भरणे सुरू
या संदर्भात मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक माहिती देताना माणाले की, तीन ठिकाणी जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण होताच जलवाहिनी भरण्यासाठी जायकवाडी येथून पंपिंग सुरू केली जाणार आहे. ३९ किमी अंतरावरील जलवाहिनी व जलकुंभ भरण्यासाठी १५ ते २० तासांचा कालावधी लागणार आहे. बुधवारी रात्री साधारणपणे १० ते ११ वाजेदरम्यान जलवाहिनी भरण्यासाठी पंपिंग सुरू केली जाईल. गुरुवारी दुपारी १ ते २ वाजेदरम्यान शहरात पाणी येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा सुरू केला जाईल.
जार, टँकरचे दर वाढले
शहरात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळताच जार आणि टँकरच्या मालकांनी अचानक पाण्याचे भाव वाढवले. १० रुपयांचा जार २० रुपयांना तर एक हजार लिटरचे टैंकर ५०० रुपये, दोन हजार लिटरचे टैंकर ७०० रुपये आणि ५ हजार लिटरचे टैंकर १ हजार रुपयांना घ्यावे लागत आहे.