विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लाडक्या बहिणींनी केलं मतदानPudhari News network
Published on
:
21 Nov 2024, 7:57 am
Updated on
:
21 Nov 2024, 7:57 am
लासलगाव : येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लासलगाव येथे निवडणूक प्रक्रिया बुधवारी (दि.२०) झाले. लासलगाव शहरातील १४ मतदान केंद्रांवर १४४८४ पैकी ८६२२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शहरात ५९.५२ टक्के मतदानाची नोंद झाली.
शहरातील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल, सरस्वती विद्यालय या तीन ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील दोन मतदान केंद्रांवर ४ वाजेनंतर लाडक्या बहिणींची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ त्यांनी दुपारी विविध मतदान केंद्रावर जात पाहणी केली. दरवेळी मतदान केंद्राबाहेर स्थानिक नेते मोठ्या संख्येने मतदार राजाला हात जोडताना मतदारांनी पाहिलेले आहे मात्र यंदा कुठल्याच पक्षाचे स्थानिक नेते मात्र उपस्थित नसल्याने अनेक मतदार अचंबित झाल्याचे पाहायला मिळाले. परिसरातील टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव विंचूर, पिंपळगाव नाशिक, कोटमगाव ,विंचूर आणि परिसरातील गावांमध्ये अनेक मतदार उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी झाले.