नवोदय विद्यालयाचे परीक्षा केंद्र बदलल्याने झाला गोंधळ
जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापकाला नव्हते परीक्षेचे गांभीर्य
डेस्क तर नाहीच वर्गातही धुळीचे साम्राज्य
जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापकाला नव्हते परीक्षेचे गांभीर्य
डेस्क तर नाहीच वर्गातही धुळीचे साम्राज्य
वसमत (Navodaya Exam) : वसमत येथे शनिवारी नवोदय विद्यालयासाठी निवड परीक्षा पार पडली या परीक्षेत वसमत येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रावर विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला परीक्षार्थी विद्यार्थ्यांना डेक्स तर उपलब्ध नव्हतेच शिवाय ज्या वर्गात परीक्षा द्यायची होती त्या वर्गातही धुळीचे साम्राज्य होते स्वच्छता करण्याचीही तसदी घेण्यात आली नाही अशा गैरसोयीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागल्याने पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. भविष्यातील वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी आणि आय एस ,आय पी एस परीक्षेसाठी जाण्याचा मार्ग म्हणून (Navodaya Exam) नवोदय परीक्षेकडे बघितले जाते ही परीक्षा पास व्हावी यासाठी विद्यार्थी जीवाचे रान करत असतात पालकही जीवओतून विद्यार्थ्यांना नवोदय पास करण्यासाठी परिश्रम घेत असतात.
वसमत येथे असलेल्या नवोदय विद्यालयासाठी (Navodaya Exam) जिल्हाभरातून 25 हजाराच्यावर विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत वसमत तालुक्यात सहा परीक्षा केंद्र असून 2470 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. वसमत शहरात 408 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. जिल्हा परिषद प्रशालेचे केंद्र नवोदय परीक्षेसाठी आहे नवोदयची परीक्षा जिल्हा नवोदय प्रवेश परीक्षा समितीच्या माध्यमातून घेण्यात येत असते परीक्षेवर या समितीचे नियंत्रण असते. नवोदय परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी नवोदय विद्यालयात जिल्ह्यातील पाचही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी व केंद्र संचालकांची बैठक घेतली होती.
या बैठकीत त्यांनी केंद्रांवर परीक्षा (Navodaya Exam) देण्यासाठी काही अडचणी आहेत का याची विचारना सर्व केंद्र संचालकांना केली होती त्यावेळी जिल्हापरिषद प्रशाला वसमतच्या मुख्याध्यापकाने कोणतीही अडचणी सांगितली नव्हती मात्र ऐनपरीक्षेच्या वेळी जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रावर गैरसोयीचा डोंगर उभा राहिला व गोंधळात गोंधळ सुरू झाला. वसमत येथे नवोदयच्यापरीक्षा होणार असल्याने त्याची पूर्वतयारी म्हणून गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे यांनी बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या होत्या व परीक्षा व्यवस्थित पार पाडावी यासाठीची तयारी केली होती.
मात्र ऐनवेळी विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे चित्र शनिवारी पहावयास मिळाले. वसमत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स उपलब्ध नसल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळाले थंडीच्या वातावरणात फरशांवर बसून परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांना आली विद्यार्थ्यांना बसण्यासाठी साधी सतरंजी किंवा चटई टाकण्याची तसदी केंद्र संचालकाकडून घेण्यात आली नाही यावरून विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी सुविधा पुरवण्यासाठी किती काळजी घेण्यात आली हे स्पष्ट होते.
ऐनवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय पाहून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे ऐनवेळी धावाधाव करणे सुरू झाले विद्यार्थ्यांना धुळीमुळे बसता येत नव्हते त्यामुळे धूळ झटकण्याचा फरशी पुसण्याचा प्रकार सुरू झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली हे सर्व प्रकार पाहून पालक वर्गात संतापाचे वातावरण होते
परीक्षा केंद्रावर असलेल्या मुख्याध्यापक केंद्रसंचालक शिक्षकांचीही बघ्याची भूमिका होती. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसताना त्रास होत आहे वेळ वाया जात आहे हे पाहून पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर संबंधित अधिकारी शिक्षकांना जबाबदार धरणार असल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या.
परीक्षा केंद्रावर गैरसोय झाल्याचे पाहून काही पालकांनी गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे यांना हा प्रकार सांगितला तात्काळ गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शाळेवर दाखल झाले तोवर परीक्षा देण्याची वेळ आली होती एवढ्या गडबडीत काही करता येणे शक्य नव्हते अशा परिस्थिती शक्यतो गोंधळ होऊ न देता परीक्षा घेण्याची कसरत करावी लागली मुख्याध्यापकाकडे या गैरसोयी बाबत काही उत्तर नव्हते व त्यांना या प्रकाराचे काही सोयरसुतक नसल्यासारखेच चित्र परीक्षा केंद्रावर पहावयास मिळाले.
या संदर्भात गटशिक्षणाधिकारी सतीश काष्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा नवोदय परीक्षा (Navodaya Exam) समितीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हाभरातील सर्व गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख व केंद्र संचालकांची बैठक घेण्यात आली होती त्यावेळी वसमत येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक व केंद्रसंचालकाने या संदर्भात कोणतीही अडचण असल्याचे सांगितले नव्हते त्यामुळे हा प्रकार उद्भवला असल्याचे सांगितले आज घडलेल्या प्रकारासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून ते योग्य ती कारवाई करतील असे सतीश काष्टे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
एकीकडे नवोदय परीक्षेसाठी (Navodaya Exam) आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना झालेली गैरसोय व गोंधळ झालेला असताना गत सप्ताहात वसमत येथे एलबीएस शाळेवर एकाच वेळी तीन हजार विद्यार्थ्यांची नवोदयची निवड चाचणी सराव परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत जिल्हाभरातून एकाच छताखाली 3000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यावेळी परीक्षार्थींना अत्यंत चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवण्यात झाल्या होत्या राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नवोदय निवड चाचणी परीक्षेच्या तयारीची आठवण आज प्रत्यक्ष नवोदय परीक्षा घेताना पालकांना व विद्यार्थ्यांना आली सेवा प्रतिष्ठानने ज्या पद्धतीने परीक्षा घेतल्या त्या पद्धतीने परीक्षा केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध असाव्यात असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.
नवोदय ने परीक्षा केंद्र न दिल्याने गोंधळात भर
दरवर्षी नवोदय निवड परीक्षेसाठी (Navodaya Exam) नवोदय विद्यालयात परीक्षा केंद्र असते यावर्षी मात्र नवोदय विद्यालयाने अंग झटकले व परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे वसमत शहरात परीक्षा केंद्र वाढवावे लागले नवोदय विद्यालयाची परीक्षा असताना नवोदय विद्यालयाने परीक्षा केंद्रासाठी जागा उपलब्ध का करून दिली नाही याची चौकशी होण्याची गरज आहे.