पालडोंगरी येथील शेतकर्यांची मागणी
तिरोडा () : नागपूर ते गोंदिया समृध्दी महामार्ग तयार होणार आहे. यासाठी भुसंपादनाचे काम होणार आहे. परंतु, महामार्गासाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहे. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शेतकर्यांनी याला विरोध दर्शविणे सुरू आहे. भुसंपादनासाठी पालडोंगरी येथील शेतकर्यांना नोटिस पाठविण्यात आले आहे. परंतु, ज्या मागण्या (Paldongari farmers) शेतकर्यांनी ठेवल्या आहेत, त्यावर सकारात्मक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे भुसंपादन करताना शेतकर्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी पालडोंगरी येथील शेतकर्यांनी केली आहे.
समृध्दी महामार्ग गोंदिया जिल्ह्यातून जाणार आहे. यासाठी तिरोडा तालुक्यातील अनेक गावातील (Paldongari farmers) शेतकर्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. ज्या शेतकर्यांच्या जमिन संपादित केली जाणार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहेत. त्यातच १९ जून २०२४ रोजी पालडोंगरी/भुराटोला ग्राम पंचायतीत यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तर शेतकर्यांना नोटिसही पाठविण्यात आले आहे. परंतु, मागण्या मंजूर केल्याशिवाय जमिन संपादित करू नये, तसेच जमिन संपादित करताना शेतकर्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
शेतकर्यांच्या मागण्या…
जमिन अधिग्रहण करताना (Paldongari farmers) शेतकर्यांना विश्वासात घ्यावे, आजच्या बाजार भावानुसार किमंतीच्या पाच पट रक्कम देण्यात यावी, महामार्गालगत उरलेल्या जमिनीवर शेती करण्याकरीता दुतर्फा वहिवाठी रस्ता देण्यात यावा, प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, भुमिहीन होणार्या शेतकर्यांना शेतजमिन उपलब्ध करून करून द्यावी, फळवर्गीय झाडे व इतर झाडाचे योग्य मुल्याकन करुन आजच्या बाजार भावाप्रमाणे किंमत देण्यात यावी, आदि मागण्यांचा समावेश आहे.
अधिकार्यांसह जनप्रतिनिधींना निवेदन
शेतकर्यांनी (Paldongari farmers) आपल्या मागण्यांना घेवून आ.विजय रहांगडाले, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे महसूल मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना जि.प.सदस्य प्रवीण कुमार पटले, उपसरपंच विनोद उईके, सितकुरा पटले, दिलीप रहांगडाले, रेखलाल रहांगडाले, तिलकचंद पटले, दिलीप चौधरी, गणराज हरीणखेडे, भूमेश ठाकरे, युवराज ठाकरे, नंदू ठाकरे, हिरालाल पंधरे, लेखराम पटले व समस्त गावकरी उपस्थित होते.