पोक्सो, अत्याचार तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल
परभणी (Child Marriage Act) : अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील मुलीचे लग्न लावले. त्यानंतर मुलीच्या पतीने ईच्छेविरुध्द शारिरीक संबंध ठेवले. यात पिडीता गर्भवती राहिली. सदर प्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरुन नवा मोंढा पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो, अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळ जालना जिल्ह्यातील असल्याने मंठा पोलिस ठाण्याकडे अधिक तपासासाठी गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
पिडीत अल्पवयीन मुलीने (Child Marriage Act) याबाबत १७ जानेवारी रोजी नवा मोंढा पोलिसात तक्रार दिली आहे. अल्पवयीन असताना सुध्दा तिचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर पतीने पिडीतेच्या ईच्छेविरोधात संबंध ठेवले. यात पिडीता गर्भवती झाली. सदर प्रकरणात पिडीतेच्या तक्रारीवरुन आई, वडील, पती, सासु, सासरे, दिर, भाया यांच्यावर नवा मोंढा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरचे प्रकरण (Child Marriage Act) जालना जिल्ह्यातील मंठा येथील असल्याने पुढील तपासासाठी मंठा पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.