परस्पर विरोधी तक्रारीवरुन नवा मोंढा पोलीसात गुन्हा
परभणी : शिवीगाळच्या प्रकरणावरुन झालेल्या वादात तिक्ष्ण हत्याराने मारुन एकाला जखमी केले. तसेच इतरांना शिवीगाळ करत धमकी देवून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली. हि घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास विद्यापीठ परिसरात घडली.
कृष्णा शेळके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विद्यापीठातील सह्याद्री हॉस्टेल मध्ये राहणार्या काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळच्या कारणावरुन फिर्यादी व त्यांच्या हॉस्टेल मधील इतर मित्रांना मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी दिपक गरे, केतन शिंदे, पार्थ भोसले, करण खोमणे, वेदांत सावळे, दर्शन जाधव यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दुसरी तक्रार करण खोमणे यांनी दिली आहे २९ जानेवारीच्या रात्री ७:४५ च्या सुमारास पुर्वा हॉस्टेलच्या जवळ चौकात शिषीर वस्तीगृहातील मुलांनी शिवीगाळच्या कारणावरुन लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. तसेच इतरांना ही मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरण निलेश शिंदे, नारायण दळवी, विश्वजीत गायकवाड, धनंजय हारकळ, प्रज्वल देसाई यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे.