परभणी/गंगाखेड(Parbhani):- कापूस वेचणीसाठी शेतात गेलेल्या विवाहितेचा दोघांनी विनयभंग केल्याची घटना बनपिंपळा शिवारात घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवार रोजी रात्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांविरुद्ध परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील ३० वर्षीय विवाहिता मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी बनपिंपळा शिवारात कापूस वेचणीसाठी गेली होती. सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास कापूस वेचून घराकडे परत येत असतांना विवाहितेच्या परिचयाचे दत्ता गोविंद चव्हाण व वैजनाथ थावरू चव्हाण दोघे रा. दत्तवाडी तिथे आले. दत्ता चव्हाण याने वाईट हेतूने विवाहितेचा हात धरून ओढत शेतात चल असे म्हणत विनयभंग (molestation)केला तर वैजनाथ चव्हाण याने छेडछाड करून विनयभंग केला. तेंव्हा विवाहितेने आरडा ओरडा करताच चुलत सासरा पळत आल्याने दोघे ही तिथून पळून गेल्याची फिर्याद विवाहितेने गंगाखेड पोलीस ठाण्यात (Police station)दिल्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.